33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रRohit Pawar : रोहित पवारांची मतदारसंघासाठी ‘स्मार्ट’ योजना

Rohit Pawar : रोहित पवारांची मतदारसंघासाठी ‘स्मार्ट’ योजना

टीम लय भारी

जामखेड : आमदार रोहित पवार आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी सतत नवनवीन उपक्रम राबवत असतात. आताही त्यांनी मतदारसंघासाठी स्मार्ट योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे ( Rohit Pawar’s plan to implement SMART project in his Karjat Jamkhed constituency ).

‘स्टेट ऑफ महाराष्ट्र ॲग्री बिझनेस ॲण्ड रूरल ट्रान्स्फॉर्मेशन प्रोग्राम’ ( SMART ) राबविण्यासाठी आमदार पवार ( Rohit Pawar conducted meeting for SMART program ) यांनी अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठकीचे आयोजन केले होते.

या प्रकल्पामुळे कर्जत – जामखेडमध्ये विविध उद्योग व व्यवसाय उभे राहतील. त्यामुळे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास होईल. ( Rohit Pawar’s new plan for the development of Karjat Jamkhed constituency ) कृषी, ग्राम, पशु संवर्धन, दुग्ध विकास, महिला व बाल विकास, नगर विकास, पणन, सहकार इत्यादी खात्यांशी संबंधित विविध उपक्रम मतदारसंघात राबविण्यासाठी आमदार पवार प्रयत्नशील आहेत.

हे सुद्धा वाचा : आमदार रोहित पवार लागले कामाला : मतदारसंघातील विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वरिष्ठ अधिकार्यांसोबत भेटींचा सपाटा

मतदारसंघात असलेल्या विविध फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांना त्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार आहे. या कंपन्यांनी पुढाकार घेतला तर शेतकरी व गावांसाठी मोठा फायदा होईल. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालावर प्रक्रिया करून तो मुंबई – पुणे आणि परदेशातही पाठविता येईल.

या प्रकल्पातून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील, पण रोजगारही वाढेल. महिला बचत गट, शेतकरी बचत गट, कृषी सहकारी संस्था यांचीही या प्रकल्पासाठी मदत घेता येईल. कृषीबरोबर दुग्ध उत्पादन, शेळीपालन या व्यवसायांचाही विकास करता येईल.

हे सुद्धा वाचा : रोहित पवार ठरले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक संपत्ती असलेले उमेदवार

या प्रकल्पासाठी येत्या जून महिन्यात निविदा निघणार आहेत. या उपक्रमांत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या फार्मर्स प्रोड्यूसर कंपन्यांना बँकांकडून वित्तपुरवठा मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार सहकार्य करणार आहेत ( Rohit Pawar ready to help Farmers Producer Companies ). वर्ल्ड बँकेकडूनही या योजनेसाठी निधी मिळणार आहे.

या बैठकीसाठी स्मार्ट प्रकल्पाचे प्रवर्तक डॉ. संजय पांढरे, दशरथ तांभाळे, प्रदीप पाटील, जे. आर. बुंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी जगताप, कर्जतचे कृषी अधिकारी दीपक सुपेकर, जामखेडचे कृषी अधिकारी सुधीर शिंदे, कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळे, तसेच दोन्हीही तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालक आदी अधिकारी सहभागी झाले होते.

हे सुद्धा वाचा : आमदार रोहित पवारांनी त्रस्त जनतेला दिला दिलासा, मतदारसंघात घेतला मोठा निर्णय

मतदारसंघ बळकटीकरणाच्या दिशेने

कर्जत – जामखेड हा मतदारसंघ गेल्या दहा वर्षांपासून भाजपकडे होता. भाजपचे माजी मंत्री राम शिंदे सलग दोन वेळा येथून निवडून आले होते. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी मतदारसंघात शिरकाव केला. निवडणुकीअगोदर दोन वर्षे त्यांनी हा मतदारसंघ बांधून काढला. त्यामुळे राम शिंदे मंत्री असतानाही बाहेरून आलेल्या रोहित पवारांनी शिंदे यांचा पराभव केला. ( Rohit Pawar defeat to Ram Shinde in Karjat Jamkhed Constituency )

रोहित पवार यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी जोरदार कामाचा धडाका लावला आहे. त्यामुळे राम शिंदे यांना मतदारसंघावर पुन्हा आपले वर्चस्व स्थापन करणे कठीण जाईल असे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी