30 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रMLC Appointment: धनगर आमदारांच्या दोन जागा रिक्त, नव्याने कुणाला संधी मिळणार ?

MLC Appointment: धनगर आमदारांच्या दोन जागा रिक्त, नव्याने कुणाला संधी मिळणार ?

टीम लय भारी

मुंबई : रामराव वडकुते यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने त्यांची जागा सहा महिन्यांपासून रिक्त आहे. रामहरी रूपनवर यांचा कार्यकाळ येत्या 6 जून रोजी समाप्त होत आहे. त्यामुळे या दोन जागांवर ( MLC Appointment ) पुन्हा धनगर समाजालाच संधी मिळणार का ? आणि संधी मिळालीच तर तिथे कुणाची वर्णी लागणार याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाने नुकतीच गोपीचंद पडळकर यांना विधानपरिषदेत ( MLC Appointment ) संधी दिली. त्या अगोदरही महादेव जानकर यांच्या रूपाने धनगर समाजाचा एक प्रतिनिधी विधानपरिषदेत आहे. काँग्रेस पक्षाने रामहरी रूपनवर, तर राष्ट्रवादीने रामराव वडकुते ( MLC Appointment ) यांना सहा वर्षांपूर्वी संधी दिली होती. आता यातील एक जागा रिक्त आहे, तर दुसरी जागाही रिक्त होणार आहे.

Devendra Fadnavis
जाहिरात

भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला घसघसीत प्रतिनिधीत्व दिलेले आहे. भाजपने मागील सरकारमध्ये दोन कॅबिनेट मंत्रीपदेही दिली होती. या उलट काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने नेहमीच धनगरांना प्रतिनिधीत्व देताना अन्याय केलेला आहे. शिवसेनेने तर एकदाही धनगर समाजाला विधानपरिषदेत ( MLC Appointment ) संधी दिलेली नाही.

येत्या 6 जून रोजी विधानपरिषदेच्या 12 जागा रिक्त होत आहेत. या जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी व शिनसेनेला प्रत्येकी 4 जागा ( MLC Appointment ) मिळणार आहेत. त्यामुळे या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी ( MLC Appointment ) एक जागा धनगरांसाठी द्यायला हवी, अशी भावना धनगर समाजातून व्यक्त केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धनगर समाजातील मातब्बर उमेदवार आहेत. यामध्ये उत्तम जानकर, सक्षणा सलगर, नानजी देवकाते यांचा समावेश आहे. उत्तम जानकर यांनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढत दिली होती. अवघ्या हजारभर मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला.

उत्तम जानकर हे विजयसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक आहेत. मोहिते पाटील यांचा झंझावात रोखण्यासाठी ते गेली 20 वर्षे कडवी झुंज देत आहेत. मोहिते पाटलांनी शरद पवार यांच्याशी गद्दारी करून भाजपशी घरोबा केला. त्यामुळे मोहिते पाटलांचा बिमोड करण्यासाठी उत्तम जानकर यांना संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.

रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने नुकतीच विधानपरिषदेची ( MLC Appointment ) आमदारकी दिली आहे. त्यामुळे अकलूज – माळशिरसमध्ये राष्ट्रवादीला पुन्हा बळकट करायचे असेल तर जानकर यांना ताकद देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.

MLC Appointment: धनगर आमदारांच्या दोन जागा रिक्त, नव्याने कुणाला संधी मिळणार ?

सक्षणा सलगर या राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षा आहेत. त्या सुप्रिया सुळे यांच्या विश्वासातील आहेत. युवती संघटनेमध्ये कार्यरत झाल्यानंतर त्यांनी राज्यभर झंझावाती वातावरण तयार केले. आक्रमक भाषणे व जोरदार आंदोलने यामुळे गेल्या पाच वर्षांत त्या राजकीय पटलावर चमकल्या.

त्या उच्चशिक्षीत आहेत. अभियांत्रिकीमध्ये पदवी, पदव्युत्तर शिक्षण त्यांनी पूर्ण केले आहे. अवघ्या बाविसाव्या वर्षी त्या उस्मानाबाद जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. महत्वाचे म्हणजे, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला अक्षरशः फोडून काढणारी भाषणे केली होती.

राष्ट्रवादीचे प्रस्थापित उमेदवारही सक्षणा सलगर यांना निवडणुकीत भाषणांसाठी निमंत्रित करायचे. तरूण तडफदार असलेल्या सक्षणा सलगर यांना आमदारकी ( MLC Appointment ) मिळाली तर त्या आणखी जोषाने काम करतील. सामान्य कुटुंबातील उच्च शिक्षीत महिलेला तिकिट दिल्याने धनगर समाजामध्येही सकारात्मक संदेश जाईल अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

शिवसेनेकडून नारायण पाटील, प्रकाश शेंडगे यांना संधी मिळायला हवी

शिवसेनेने आतापर्यंत कधीच धनगर समाजाला विधानपरिषदेची ( MLC Appointment ) संधी दिलेली नाही. शिवाय नारायण पाटील हे आमदार असतानाही शिवसेनेने त्यांचे गेल्या विधानसभेला तिकिट कापले होते. वास्तवात सन 2014 च्या निवडणुकीत पाटील हे प्रस्थापित राजकारण्यांना टक्कर देत निवडून आले होते. त्यांच्यामुळे करमाळ्यात शिवसेना रूजली.

पण उद्धव ठाकरे यांचे त्यावेळचे निकटवर्तीय तानाजी सावंत यांनी नारायण पाटील यांच्या विरोधात काड्या केल्या. सावंत यांनी सन 2019 च्या निवडणुकीत नारायण पाटील यांचे तिकिट कापले. सावंतांनी राष्ट्रवादीच्या रश्मी बागल यांना पक्षाचे तिकिट दिले. रश्मी बागल यांचा पराभव झाला. नारायण पाटील यांच्यावरही अन्याय झाला.

‘महाविकास आघाडी’ सरकार सत्तेवर आल्यानंतर तानाजी सावंतांना मंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे सावंतांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला. सावंत सेनेतून बाहेर पडल्याने नारायण पाटील यांचे शिवसेनेशी पुनश्च मधूर संबंध तयार झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेने नारायण पाटील यांच्यावर झालेला अन्याय भरून काढण्यासाठी त्यांना विधानपरिषदेवर ( MLC Appointment ) संधी द्यायला हवी अशी भावना धनगर समाजातून व्यक्त करण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी प्रकाश शेंडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेऊन धनगर व ओबीसी समाजाने शिवसेनेला मतदान करावे असे आवाहनही शेंडगे यांनी केले होते. त्यामुळे शिवसेनेतून धनगरांना संधी मिळू शकते असे बोलले जात आहे.

Mahavikas Aghadi

काँग्रेसमध्ये सध्या रामहरी रूपनवर यांचा कालावधी संपत आहे. त्यांनाच पुन्हा संधी द्यावी. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासोबत वर्षानुवर्षे बाजीराव खेमणर व त्यांचे कुटुंबिय निष्ठावंत राहिलेले आहेत. त्यामुळे रूपनवर यांना संधी देता आली नाही, तर खेमणर यांना संधी द्यावी अशी भावना धनगर समाजातून व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यपालांचा कोलदांडा

विधानपरिषदेच्या ( MLC Appointment ) 12 जागांवर संधी मिळावी म्हणून अनेक इच्छूक आहेत. पण राज्यपाल भगत सिंग कोश्यारींची भूमिका सुद्धा महत्वाची ठरणार आहे. भारतीय राज्य घटनेनुसार साहित्य, विज्ञान, कला, सहकार व सामाजिक कार्ये या क्षेत्रांतील लोकांचीच नियुक्ती करणे बंधनकारक आहे.

मात्र गेली कित्येक वर्षे घटनेतील ही तरतूद धाब्यावर बसवून राजकीय नियुक्त्या केल्या जातात. विद्यमान राज्यपाल हे आडमुठ्या स्वभावाचे आहेत. ते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सतत काड्या करीत राहतात. त्यामुळे या 12 जागांवरील नियुक्त्यांमध्ये कोलंदाडा घालण्याची संधी त्यांना चालून आली आहे. ही संधी ते सहजासहजी घालवणार नाहीत, असेही बोलले जात आहे.

हे सुद्धा वाचा

Gopichand Padalkar : गोपीचंद पडळकरांवर टीका केल्याने एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, जयंत पाटील ठरताहेत धनगर समाजाचे खलनायक

वारसा हक्काने नोंद झालेली जमीन ब्राह्मण कुटुंबाने कसणाऱ्या धनगरांच्या नावे केली

Rural Maharashtra : धनगर समाजाच्या देवीची यात्रा शेकडो वर्षानंतर रद्द !

धनगर समाजासाठी अजितदादांकडे १ हजार कोटींची मागणी; धनगर शिष्टमंडळाचा आग्रह, आरक्षणाबाबतही दिले आश्वासन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी