31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्ररोहित पवारांची MPSC परीक्षार्थींसाठी मुख्यमंत्र्यांकडे 'ही' मागणी

रोहित पवारांची MPSC परीक्षार्थींसाठी मुख्यमंत्र्यांकडे ‘ही’ मागणी

टीम लय भारी

मुंबई :- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकराने मिनी लॉकडाऊन केले आहे. तसेच विकेंड लॉकडाऊन आणि कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व स्तरातील व्यक्तींसोबत चर्चा केल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पण विकेंड लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ११ एप्रिल रोजी होणारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परिक्षेवर अनिश्चिततेचे सावट आहे. अशावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे महत्वाची मागणी केली आहे.

‘लॉक डाऊन’ असताना रविवारी होणाऱ्या #MPSC परिक्षेसाठी वाहतूक व्यवस्थेबाबत स्पष्टता यायला हवी. परीक्षा होणार असेल तर कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत. तसेच बाधित मुलांची वयोमर्यादा संपत असेल तर त्यांना आणखी एक संधी देण्याबाबत सरकारने विचार करावा, ही विनंती. असे ट्वीट रोहित पवार यांनी केले आहे.

परीक्षार्थींच्या मनात शंका

राज्य सरकारने रविवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन असणार आहे. अशावेळी स्पर्धा परिषेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमपीएससी (MPSC) ची परीक्षा होणार का असा प्रश्न पडला आहे. रविवारी होणाऱ्या परीक्षेबाबत राज्य सरकारकडून काहीच सूचना आलेली नाही. या परीक्षेसाठी राज्यातून ३ लाख ८२ हजार विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षेबाबत सरकारकडून एमपीएससी प्रशासनाला कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. अशावेळी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या रविवारी होणार का? असा प्रश्न या विद्यार्थ्यांना पडला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी