31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्र'हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जाएगा' संजय राऊत यांचा...

‘हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जाएगा’ संजय राऊत यांचा उदय सामंत यांना इशारा

नाणारला पर्याय म्हणून बारसूची ओसाड जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, बारसू प्रकल्पालाही स्थानिक जनतेचा विरोध असेल तर आम्ही जनतेसोबत आहोत. तेथील जनता या रिफायनरीला विरोध करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यास तयार असतील तर पहिली गोळी छातीवर झेलण्यास शिवसेना तयार आहे.

बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध असेल तर आम्ही जनतेच्या सोबत आहोत. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी लोक छातीवर गोळ्या झेलण्यास तयार असतील तर पहिली गोळी शिवसेना छातीवर झेलेल, असे सांगतानाच ‘हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जाएगा… आम्हाला शहाणपणा शिकवू नका, असा खणखणीत इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना दिला.

प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, नाणार प्रकल्पाला स्थानिक जनतेचा विरोध होता. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर असताना हा प्रकल्प बासनात गुंडाळला. नाणारला पर्याय म्हणून बारसूची ओसाड जागा निश्चित करण्यात आली होती. मात्र, बारसू प्रकल्पालाही स्थानिक जनतेचा विरोध असेल तर आम्ही जनतेसोबत आहोत. तेथील जनता या रिफायनरीला विरोध करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यास तयार असतील तर पहिली गोळी छातीवर झेलण्यास शिवसेना तयार आहे. कुठलाही उद्योग महाराष्ट्राबाहेर जाऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यामुळे बारसूबाबत शिवसेनेने दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोप राऊत यांनी फेटाळून लावला.

रोजगार राहिला पाहिजे, ही बाळासाहेबांची भूमिका होती. उद्योग आला तर रोजगार वाढेल, ही आमची भूमिका आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, त्यांनी नाणारला जाऊन लोकांशी बोलले पाहिजे. एअर बस, फॉस्कॉन वेदांत हे उद्योग प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले. वित्तीय केंद्र गुजरातला गेले, ते कोकणात होते का ? असा सवाल राऊत यांनी केला. या मुद्यावरून उदय सामंत यांच्यावर टीका करताना राऊत यांनी ‘हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जाएगा, ध्यान रखना ‘ असा अग्निपथ चित्रपटातील डायलॉग मारला. बारसूतील लोकांना प्रकल्प नको आहे. प्रकल्पाला विरोध करण्यासाठी जनता गोळ्या झेलण्यास तयार असतील तर शिवसेना त्यांना मरू देणार नाही.

हे सुध्दा वाचा :

शेतकरी आत्महत्या बंद का होत नाहीत? त्याने रक्ताच्या थेंबाने लिहिले राज्यपालांना पत्र..!

शिंदे-फडणवीस सरकारलाच प्यारे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे

बारसू रिफायनरीवरून महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा ; ठाकरे गटाच्या खासदारांची बैठक

आम्हाला कोणाच्या सुपाऱ्या घेण्याची गरज नाही. शिवसेना फोडण्याची सुपारी घेऊन काम करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर समोर यावे, असा इशाराही राऊत यांनी दिला. कागदावर तुम्ही शिवसेना ट्रान्सफर केली असेल पण जनता अजूनही आमच्यासोबत आहे. आम्ही फडणवीस यांच्याबद्दल संयमाने विधाने केली आहेत, आमच्या अंगावर आलात तर सोडणार नाही, असा दम राऊत यांनी दिला

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी