33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराष्ट्रीयछत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11  जवान शहीद

छत्तीसगढमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11  जवान शहीद

छत्तीसगढ मधील दंतेवाडा येथे लक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भू सुरुंगाच्या स्फोटात 11 जवान शहीद झाले आहेत. हे सर्व जवान डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (डीआरजी)मधील होते. नक्षलवाद्यानी ‘आयईडी’ स्फोटकांचा वापर करुन हा हल्ला घडवून आणला.

मिळालेल्या माहितीनुसार डीआरजीच्या जवानांना अरनपुर परिसरात काही माओवादी असल्याची खबर मिळाली होती. मिळालेल्या खबरीनुसार दंतेवाडा येथून डीआरजीचे जवान नक्षलवाद्यांवर कारवाईसाठी निघाले होते. या मोहीमेवरुन परत येताना नक्षलवाद्यांनी अरनपुर मार्गावर आयईडी स्फोटकांचा स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात डीआरजीचे 11 जवान शहीद झाले.

मिळालेल्या माहितीनुसार या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी अधिक सुरक्षाव्यवस्था पाठविण्यात आली आहे. सध्या नक्षलवादी कारवाया थांबविण्यासाठी नक्षवाद्यांच्या विरोधात कारवाया वाढविण्यात आल्या आहेत. त्यातच नक्षलवाद्यांकडून देखील घातपात घडविण्यात येत आहेत. मागच्या महिन्यात माओवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात सीएएफच्या एका जवानाचा मृत्यू झाला होता. तर त्या आधी 9 मार्च रोजी छत्तीसगढमधील सुकमा येथे नक्षलवादी आणि कोबरा बटालियन आणि एसटीएफच्या जवानांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत जवानांनी मोठ्याप्रमाणात स्फोटके जप्त केली होती. या चकमकीत पाच ते सहा नक्षलवादी जखमी झाले होते.

हे सुद्धा वाचा 

‘हवा बहोत तेज चल रही है, टोपी उड जाएगा’ संजय राऊत यांचा उदय सामंत यांना इशारा

शिंदे-फडणवीस सरकारलाच प्यारे मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे

वंचितचा मुंबईत एल्गार मेळावा

दरम्यान छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करत. नक्षवादावरोधातील लढा अंतिम टप्प्यात आला असून नक्षलवादाचा बिमोड करणार असल्याचे म्हटले आहे. तर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी