34 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्य सचिव पदावर संजयकुमार यांची नियुक्ती, अजोय मेहता मुख्यमंत्री कार्यालयात

मुख्य सचिव पदावर संजयकुमार यांची नियुक्ती, अजोय मेहता मुख्यमंत्री कार्यालयात

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून संजयकुमार ( Sanjaykumar new Chief Secretary in Maharashtra )  यांची नियुक्ती झाली झाली आहे, तर विद्यमान मुख्य सचिव अजोय मेहता यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश गुरूवारी जारी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mahavikas Aghadi

अजोय मेहता यांचा कार्यकाळ येत्या ३० जून रोजी संपत आहे ( Ajoy Mehta’s tenure will end on 30th June). मेहता यांना यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यामुळे आता तिसऱ्या वेळी त्यांना मुदतवाढ देण्यात आली नाही. परंतु मेहता यांच्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात विशेष पद निर्माण करण्यात आले असून तिथे त्यांची आता नव्याने नियुक्ती होईल ( Special post has created for Ajoy Mehta in CM office).

हे सुद्धा वाचा

फसवणूक : रामदेव बाबा विरुध्द सरकार गुन्हा दाखल करणार

गोपीचंद पडळकरांना फडणवीस, मुनगंटीवार यांच्याकडून कानपिचक्या

IAS transfers : मुंबई महानगर क्षेत्रात दोन दिवसांत चार महापालिकांमध्ये नवे आयुक्त

संजयकुमार व सिताराम कुंटे या दोन्ही वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांची मुख्य सचिव पदासाठी नावे चर्चेत होती. परंतु संजयकुमार यांची निवड मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्य सचिव पदावर संजयकुमार यांची नियुक्ती, अजोय मेहता मुख्यमंत्री कार्यालयात

संजयकुमार हे सध्या गृह व गृह निर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी महिला व बाल विकास, उच्च – तंत्र शिक्षण व शालेय शिक्षण या खात्याच्या सचिव व प्रधान सचिव या पदांवर कामे केली होती.

येत्या १ जुलै रोजी संजयकुमार मुख्य सचिव पदाची सूत्रे घेतील असे सूत्रांनी सांगितले ( Sanjaykuamar will take charge on 1st July as Chief Secretary) .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी