30 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरमहाराष्ट्र'मी माझ्या पगारावर समाधानी'; साताऱ्यातील सरकारी अधिकाऱ्याच्या फलकाची चर्चा

‘मी माझ्या पगारावर समाधानी’; साताऱ्यातील सरकारी अधिकाऱ्याच्या फलकाची चर्चा

सरकारी काम सहा महिने थांब अशी परिस्थीती महाराष्ट्र राज्यातच नाही तर संपूर्ण देशात पाहायला मिळते. शहर असो वा खेडेगाव या ठिकाणी सरकारी अधिकारी आपल्या कामाचा मोबदला पगारापेक्षा टेबलाखालून अधिक मिळवतात. बरेच सरकारी अधिकारी मलाई खातात. आणि हे सत्य देखील आहे. सरकारी अधिकारी आणि दलाल यांच्यात अधिक गट्टी असते. याचा फयदा दलालासही होतो. त्याचप्रमाणे सरकारी अधिकारी गोरगरीबांकडून गरजेपेक्षा अधिक पैसे घेतात. हे वास्तव नाकारता येत नाही. मात्र यावर आता सातारा येथील गटविकास अधिकाऱ्याने सरकारी काम आणि प्रामाणिकपणा या दोन्ही बाबी सोबत घेऊन भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांना शिकवण दिली आहे. आपल्या दालनासमोर ‘मी माझ्या पगारावर समाधानी’ असल्याचा फलक लावला आहे. याची चर्चा सुरू आहे.

दलालांचे धाबे दणाणून सोडले

कुणी तलाठी, तहसिलदारांचा दूरध्वनी क्रमांक द्यायचा म्हटले तरीही काही शिपाई मागे पुढे पाहतात. हजारदा पंचायत कार्यालयात गेलो तरीही आजचे उद्या, उद्याचे परवा सामान्यांना नुसतीच पायपीट करावी लागते. यावेळी एखादे काम लवकर होत नसल्याने दलालास हाताशी धरून सरकारी अधिकारी काम करतात. टेबलाखालून मलई मिळवणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी शिकवण म्हणून आता सातारा येथील गटविकास अधिकारी सतिश बुद्धे यांनी आपल्या दालनासमोर मी माझ्या पगारावर समाधानी आहे. अशा आशयाचा फलक लावला आहे. देशात राज्यात कुणीच कधी आपल्या पगारावर बोलत नाही. मात्र अधिकारी सतिश यांनी समाजिक भावना लक्षात घेवून सामान्यांचे भले आणि दलालांचे धाबे दणाणून सोडले आहेत.

मी माझ्या पगारावर समाधानी

सतिश बुद्धे नवनिर्वाचित अधिकारी हे मुळचे लातूर विभागातील असून (७ ऑक्टोबर) सातारा येथे गटविकास अधिकारी पदावर कामाची धुरा सांभाळली आहे. यांनी यांच्या सरकारी दालनासमोरच एक फलक लावला आहे. या फलकाची चर्चा अनेक ठिकाणी होऊ लागली आहे. या फलकावर सतिश यांनी मी माझ्या पगारावर समाधानी आहे. अशा आशयाचे मत लिहले आहे. याचसह त्यांनी मी दैऱ्यावर असताना भेटु शकलो नाही तर खालील दिलेल्या क्रमांकावर निवेदन, तक्रारी स्वरूपात (संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या अभिप्रायानंतर नाव, गावासह, मोबईल क्रमांक नमूद करावा) असे त्यांनी आपल्या फलकावर नमूद केले आहे.

सातारकरांनी खात्री बाळगावी

कार्यालयात माझ्याप्रती कोणतेही गैर काम होऊ नये. यासाठी हा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. लोकसेवक म्हणून काम करताना शासनाकडून मिळणारा पगार पुरेसा आहे. अधिक माया जमवायची इच्छा नाही. जे योग्य काम आहे, ते मार्गी लावणारच सातारकरांनी खात्री बाळगावी, असे सरकारी अधिकारी सतिश बुद्धे म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी