33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमुंबईअर्थतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर शनिवारी, रविवारी ‘भीमभाष्य’

अर्थतज्ज्ञ, कृषीतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर शनिवारी, रविवारी ‘भीमभाष्य’

प्रसिद्ध अर्थतज्ञ नरेंद्र जाधव यांनी ‘भीमभाष्य’ या ऑडियो व्हिजुअल पॉडकास्ट महामालिकेतून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे तब्बल २५ पैलू उलगडून दाखवत आहेत. त्याला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच कार्यक्रमात शनिवार, दिनांक २८ ऑक्टोबर २०२३ रोजी भाग पाचचे प्रसारित करण्यात येईल. विषय आहे ‘डॉ. आंबेडकर आणि भारतीय कृषि क्षेत्रः लहान जमीनधारणेची समस्या आणि उपाय (१९१८)’ आणि मालिकेचा सहावा भाग, रविवार,२९ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसारित होईल. त्याचा विषय आहे, ‘भारतीय रुपयाचा प्रश्नः उद्गम आणि उपाय’ (DSc प्रबंध, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, १९२३) विशेष म्हणजे या प्रबंधाला यंदा शंभर वर्ष होत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या जगातील त्यांच्या चाहत्यांसाठी ही मालिका वैचारिक मेजवाणी देणारी ठरत आहे. तर चल यू ट्युब चॅनलवर Dr Narendra Jadhav World असे टाइप करूया आणि या मालिकेचा आस्वाद घेऊया.

जगात जे मोठमोठे विचारवंत, समाजसुधारक झाले आहेत त्यापैकी बाबासाहेब आंबेडकर हे एक आहेत. आयुष्यभर ग्रंथाच्या सहवासात राहणाऱ्या या महामानवाचे आयुष्य हा एका खंडकाव्याचा विषय आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा मांडणारे लाखों पुस्तके जगभरात उपलब्ध आहेत. पण नव्या पिढीला बाबासाहेब त्याच्या माध्यमातून समजावे यासाठी हा ऑडियो व्हिजुअल पॉडकास्टचा प्रपंच नरेंद्र जाधव यांनी मांडला आहे.

आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे तब्बल २५ पैलू ‘भीमभाष्य’ या प्रसिद्ध अर्थतज्ञ डॉ. नरेन्द्र जाधव यांच्या ऑडियो व्हिजुअल पॉडकास्ट मालिकेतून उलगडून दाखविण्यात येत आहे. प्रत्येकी साधारण २० मिनिटांचा एक, असे एकूण ५४ भाग असलेल्या या पॉडकास्ट महामालिकेच्या माध्यमातून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचे तब्बल २५ पैलू उलगडून दाखविण्यात येणार आहेत. मराठी, हिन्दी आणि इंग्लिश अशा तीन भाषांमध्ये ही मालिका आहे.

१४ ऑक्टोबर २०२३(धम्मचक्रप्रवर्तन दिन)रोजी सुरु झालेली ही पॉडकास्ट महामालिका प्रत्येक शनिवारी आणि रविवारी (सकाळी ११.३० वाजता) दाखविण्यात येत असून ती १४ एप्रिल २०२४( डॉ आंबेडकर जयंती) पर्यंत नियमितपणे चालेल. यामालिकेचे आतापर्यंत डॉ बाबासाहेब आंबेडकरः युगप्रवर्तक बहुआयामी प्रतिभावंत, अखंड ज्ञानमार्गी डॉ आंबेडकर, अर्थतज्ञ डॉ आंबेडकर, ईस्ट इंडिया कंपनीः प्रशासन व वित्तप्रणाली MA Thesis, कोलंबिया विश्वविद्यालय, न्यूयॉर्क, १९१५ असे चार भाग झाले आहेत.

भीमभाष्य ही प्रदीर्घ पॉडकास्ट महामालिका (लांबी सुमारे १८ तास- प्रत्येक भाषेमध्ये ) अनेक खंड असलेल्या संदर्भ ग्रंथांप्रमाणे कायमस्वरुपी विनामूल्य उपलब्ध असणार आहे. यू ट्युब चॅनलवर Dr Narendra Jadhav World इथे ही मालिका पाहता येणार आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वात विविध पैलू होते.

हे सुद्धा वाचा

 ‘महाराष्ट्राचे मंत्रालय गुजरातमध्ये हलवणार’
आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा उद्यापासून
आरोपी अविनाश भोसले तुरुंगात की राजेशाही रुग्णालयात?

ते जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, मानववंश अभ्यासक, राज्यघटनेचे शिल्पकार, समाजसुधारक, मानवमुक्तीचे खंदे पुरस्कर्ते, ग्रंथ संग्राहक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे पाठीराखे, इतिहास अभ्यासक होते. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत मोठ्या प्रमाणात विविध विषयांवर लिखाण केले आहे. हजारो भाषणे दिलेली आहेत. तत्कालीन प्रश्नांवर लिखाण केले आहे. बाबासाहेब यांचे व्यक्तिमत्व एका तासाच्या चित्रपटात, वा एका पुस्तकात मावणारे नाही.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी