31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रशरद पवार यांच्यावर ब्रीच कॅंडी रूग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी; सध्या प्रकृती स्थिर

शरद पवार यांच्यावर ब्रीच कॅंडी रूग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी; सध्या प्रकृती स्थिर

टीम लय भारी

मुंबई :-  राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कॅंडी रूग्णालयात शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. ही शस्त्रक्रिया आज होणार होती. परंतु मंगळवारी रात्री पुन्हा त्रास सुरू झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पण, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. परंतु, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.

शरद पवार यांच्या शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे रात्री उशीरा रुग्णालयाबाहेर पडले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांना दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे सांगितले.

शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?

शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांना थोडी कावीळ ही झाली होती. ती देखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती. आता शरद पवार यांची प्रकृती कशाप्रकारे सुधारते, यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी द्यायचा हे ठरवले जाईल, असे ही डॉक्टरांनी सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी