31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रसुप्रिया सुळेंनी ट्विट केला शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांचा फोटो

सुप्रिया सुळेंनी ट्विट केला शस्त्रक्रियेनंतर शरद पवारांचा फोटो

टीम लय भारी

मुंबई :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पोटदुखीच्या त्रासामुळे त्यांना मंगळवारी रात्री ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे काल रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. यानंतर शरद पवार यांची कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटर अकाऊंटवरुन शरद पवार यांचे छायाचित्र शेअर केले आहे. यामध्ये शरद पवार वर्तमानपत्र वाचताना दिसत आहेत.

शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. परंतु, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. पण, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.

शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?

शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांना थोडी कावीळ ही झाली होती. ती देखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.

ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती. आता शरद पवार यांची प्रकृती कशाप्रकारे सुधारते, यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी द्यायचा हे ठरवले जाईल, असे ही डॉक्टरांनी सांगितले.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी