31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रअकोला बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्यात 'शिदोड'

अकोला बस स्थानकावरील पिण्याच्या पाण्यात ‘शिदोड’

टीम लय भारी

अकोला :-  अकोल्याच्या मध्यवर्ती बस स्थानकात पिण्याच्या पाण्यातून बाहेर पडले शिदोड. पावसाळ्यात पिण्याच्या पाण्याच्या साठ्यांची जास्त काळजी घ्यावी लागते. महाराष्ट्रातील बहुतांश रेल्वे स्टेशन आणि बस स्थानकांवर ही काळजी घेतली गेलेली दिसत नाही (Shidod in drinking water at Akola bus stand).

बस स्थानकांवर अस्ताव्यस्त लूत भरलेली कुत्री आणि अजागळ भिकारी सहज पसरलेले आढळतात. त्यांच्यामुळे प्रवाशांना वाट पाहताना अडचणींचा सामना करावा लागतो. इतस्ततः पसरलेली घाण, त्यामूळे येणारी दुर्गंधी. याच परिस्थितीत प्रवाशांना प्रवास करावा लागतो. जुन्या, गळक्या गाड्या. त्यावर मळक्या माती लागलेल्या सीट्स, अत्यंत दुरावस्थेत असलेली प्रसाधनगृहे, प्रत्येक फेरीला घेतले गेलेल्या 5 आणि 10 रुपयांची काय साफसफाई होते असा प्रश्न प्रशासनाकडे विचारल्यास त्यावर सर्रास दुर्लक्ष होताना दिसते.

मनसेने मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची उडविली खिल्ली

वसई समुद्रकिनाऱ्यावर एकाच आठवड्यात 2 मृतदेह

काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे निधन, वाढदिवसा दिवशीच घेतला जगाचा निरोप

Explained: How DA hike benefits central govt employees, pensioners

Shidod in drinking water at Akola bus stand
पिण्याच्या पाण्यात ‘शिदोड’

अकोला येथील मध्यवर्ती बस स्थानकातील चौकशी खिडकीच्याच बाजूला असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या नळातून चक्क शिदोड बाहेर पडले. तोटी वर खेचताच बाहेर आलेल्या शिदोडाचा व्हिडीओ व फोटो अनेकांनी सोशल मीडियावर व्हायरल करत प्रशासनाची टर उडवली आहे (Shidoda video and photo have gone viral on social media and many have ridiculed the administration).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी