31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा प्रस्ताव रोखला  

मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन शिक्षणाचा प्रस्ताव रोखला  

लय भारी टीम

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यानुसार इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना दिवसभरातून तीन तास ऑनलाईन शिक्षण दिले जाणार आहे, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. शिक्षण विभागाकाडून याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून तो मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला आहे. (Online education learning Proposal ) मात्र तो प्रस्ताव अद्यापही पास करण्यात आला नाही.

शिक्षण खात्याने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या प्रस्तावानुसार, पूर्व प्राथमिक, प्राथमिक आणि दुसऱ्या वर्षाच्या मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जाणार नाही. तर तिसरी आणि चौथीच्या विद्यार्थ्यांना एका तासासाठी ऑनलाईन शिक्षण दिले जाईल. तर पाचवी-सहावीच्या मुलांनी दोन तास ऑनलाईन शिक्षण देण्यात येईल. त्याशिवाय नववी ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना तीन तास ऑनलाईन शिक्षण दिलं जाणार आहे. राज्य सरकार लवकरच याबाबतचे निर्देश जारी करणार आहे. सध्या याबाबतचा प्रस्ताव शिक्षण मंडळाकडून मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आला आहेत. या प्रस्तावावर अंतिम मंजूरी मिळाल्यानंतरच यावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी शालेय शिक्षण विभागासोबत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शैक्षणिक वर्ष सुरु झालेच पाहिजे असे निर्देश दिले होते. “आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरु करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरु करा. तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे. कोरोनासारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्ट्राने देशाला दाखवून द्यावे,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. “गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा. मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी,” असेही ते यावेळी म्हणाले होते. (Online education learning Proposal)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी