महाराष्ट्र

सर्वात मोठी बातमी : संजय राऊत म्हणतात, भाजप आणि आपचे सेटिंग!

याक्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे, की आप आणि भाजप यांच्यात पूर्ण “सेटिंग” आहे. आम आदमी पक्षाला दिल्ली राहू द्यायची आणि त्यांनी भाजपला गुजरात राखण्यासाठी मदत करायची, अशी ही सेटिंग असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुपारी भाजप पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

गुजरात निवडणूक निकालाबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, की गुजरातचे निकाल अपेक्षितच आहेत. त्यात धक्कादायक असे काहीच नाही. जे निकाल येऊ पाहत आहेत, त्याचे मला आजिबात आश्चर्य वाटत नाही. आपने दिल्ली ताब्यात घेऊन गुजरात भाजपसाठी सोडावी, असा जणू समजोता झाल्याचा जनतेला संशय आहे. या दोन्ही पक्षांमधील स्पष्ट समजूतदारपणाचा म्हणजे समजनेवालोको इशारा काफी असल्याचेच जणू राऊत यांनी सूचित केले.

हे सुद्धा वाचा

गुजरात : भाजप मोडणार सर्वाधिक जागांचा विक्रम, तर काँग्रेसचाही सर्वात कमी जागांचा विक्रम होणार!

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ओलांडला बहुमताचा टप्पा; भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका!

क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा पिछाडीवर; जाणून घ्या गुजरातचे लेटेस्ट अपडेट्स कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर

गुजरातमध्ये भाजप तब्बल 160चा आकडा गाठताना दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेसची कामगिरीही अतिशय खालावताना दिसत आहे. निवडणूक निकालाचे कल पाहता, आपच्या उमेदवारांनी पूर्णतः काँग्रेसच्या वाट्याची मते खाल्लेली दिसत आहेत. दुरंगी लढतीत भाजपाला नाकीनऊ आणणाऱ्या काँग्रेसची आप रिंगणात उतरल्याने झालेल्या तिरंगी लढतीत पार वाताहात होताना दिसत आहे.

ताज्या निकालानुसार, दाहोदमधून भाजपचे कनैयालाल बच्चूभाई किशोरी विजयी झाले आहेत.

पाटीदार बहुल अमरेलीमध्येही काँग्रेसचा धक्कादायक पराभव होताना दिसत आहे. काँग्रेस नेते परेश धनानी यांची धक्कादायक पराभवाकडे वाटचाल दिसून येत आहे. ते भाजप उमेदवाराच्या तुलनेत ते 5,600 पेक्षा जास्त मतांनी पिछाडीवर आहेत. यापूर्वी त्यांनी अमरेली विधानसभा मतदारसंघातून सलग तीन निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता.

अहमदाबादमधील नरोडा येथून पायल कुकरानी या मोठी आघाडी घेताना दिसत आहेत. 2002 च्या गोध्रा नरोडा पाटिया हत्याकांडातील 16 दोषींपैकी एक असलेल्या मनोज कुकरानी याच्या त्या कन्या आहेत. 2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी मनोज कुकरानीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती; पण सध्या तो जामिनावर बाहेर आहे.

विक्रांत पाटील

Recent Posts

शहरातील जीर्ण वाड्याबाबत मनपा उदासीन; नागरिक धोक्यात

नियमाप्रमाणे महापालिका हद्दीतील एखाद्या इमारतीचे ३० वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान झाल्यास स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे आहे.…

4 hours ago

सिडको गोळीबार प्रकरणातील ८ जणांवर मोक्का

गुन्हेगारी टोळीतील आठ आरोपींना बंदुकीने फायर करणे महागात पडले. या आरोपींना  माेक्का (MCOCA) लावण्यात आला…

5 hours ago

कर्नाटकातील अत्याचार हा नारीशक्तीचा अपमान;काँग्रेस प्रवक्ता प्रगती अहिर यांची भाजपावर टीका

भारतीय जनता पक्षाचा कर्नाटकातील मित्रपक्ष जेडीएसचा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केले…

5 hours ago

सिडको विभागात सायकल रॅलीसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली.

याअंतर्गत स्वीप उपक्रम प्रभावीपणे राबवला जात आहे. या उपक्रमा अंतर्गत नवीन नाशिक विभागात महिला बचत…

5 hours ago

पोटच्या मुलीलाच देहविक्रीस भाग पाडून तिच्या जन्मदात्यांनी विकलं

पालघर मधून एक धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आलीये. स्त्रियांवर आणि बालकांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ…

8 hours ago

अश्रू, तुझा खरा रंग कंचा ? रोहित पवारांचा की अजित पवारांचा ??

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सपाटून मार खाल्ला होता. अशातच अजितदादांच्या मागं…

8 hours ago