28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयहिमाचल प्रदेशात काँग्रेसने ओलांडला बहुमताचा टप्पा; भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका!

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने ओलांडला बहुमताचा टप्पा; भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका!

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सातत्याने सत्ताविरोधी कौल देण्याची परंपरा हिमाचलमधील मतदार यावेळीही राखताना दिसत आहेत. इथे भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसताना दिसतोय. दिल्ली महापालिका आणि गुजरातमधून सुफडा साफ होत असताना काँग्रेसला हिमाचलाच्या निकालाने पुनरुज्जीवन मिळण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशात काँग्रेसने बहुमताचा टप्पा ओलांडला आहे. सातत्याने सत्ताविरोधी कौल देण्याची परंपरा हिमाचलमधील मतदार यावेळीही राखताना दिसत आहेत. इथे भाजपला अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसताना दिसतोय. दिल्ली महापालिका आणि गुजरातमधून सुफडा साफ होत असताना काँग्रेसला हिमाचलाच्या निकालाने पुनरुज्जीवन मिळण्याची शक्यता आहे. हिमाचलमध्ये बहुमतासाठी 68 पैकी 34 जागा आवश्यक आहेत.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सेराजमधून विजय नोंदवला आहे. मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस 38 तर भाजप 24 जागांवर आघाडीवर आहे. भाजपचे तीन बंडखोर उमेदवार विजयी होण्याची चिन्हे आहेत. टाईम्स नाऊनुसार, याक्षणी हिमाचलमध्ये काँग्रेस 35 जागांवर, तर भाजप 29 जागी आघाडीवर आहे. आपला इथे अजून भोपळाही फोडता आलेला नाही. इंडिया टुडेनुसारही, काँग्रेस 35 वर, तर भाजप 29 आणि आप शून्य अशी आघाडी आहे. न्यूज 18 नेटवर्कने काँग्रेस 35 तर भाजप 30 जागांवर आघाडीवर असल्याचे वृत्त दिले आहे.

हे सुद्धा वाचा

क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा पिछाडीवर; जाणून घ्या गुजरातचे लेटेस्ट अपडेट्स कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर

“आप”चे उमेदवार खाताहेत काँग्रेसचीच मते; भाजपालाही भरभरून मतदान!

गुजरात निवडणूक : भाजपाची 150 जागांवर आघाडी

आशा कुमारी या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डलहौसी येथून 1,187 मतांनी पिछाडीवर आहेत. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुखविंदर सिंग सुखू हे हमीरपूर जिल्ह्यातील नादौन जागेवर 2,932 मतांनी आघाडीवर आहेत. याशिवाय, जय राम ठाकूर (भाजप) सेराज पूरन चंद (भाजप), दरंग चेतन ब्रागाटा (भाजप), जुब्बल कोटखई येथून अनिल शर्मा (भाजप), मंडी सदरातून जगतसिंग नेगी (काँग्रेस) हे आघाडीवर आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी