24 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरराष्ट्रीयक्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा पिछाडीवर; जाणून घ्या गुजरातचे लेटेस्ट अपडेट्स...

क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा पिछाडीवर; जाणून घ्या गुजरातचे लेटेस्ट अपडेट्स कोण आघाडीवर, कोण पिछाडीवर

गुजरात विधानसभा निवडणूक निकालात जामनगर उत्तरमधून सुरुवातीला आघाडीवर असलेल्या क्रिकेटर रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा आता पिछाडीवर आहेत. आपचे उमेदवार करशनभाई कर्मूर हे आता 4,582 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपच्या रिवाबा जडेजा मात्र आता तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत.

गुजरात विधानसभा निवडणूक निकालात जामनगर उत्तरमधून सुरुवातीला आघाडीवर असलेल्या क्रिकेटर रवींद्र जडेजा यांची पत्नी रिवाबा जडेजा आता पिछाडीवर आहेत. आपचे उमेदवार करशनभाई कर्मूर हे आता 4,582 मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेसचे बिपेंद्रसिंह चतुरसिंह जडेजा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. भाजपच्या रिवाबा जडेजा मात्र आता तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेल्या आहेत.

जामनगर उत्तरमध्ये क्रिकेटर रवींद्र जडेजा यांच्या पत्नी रिवाबा जडेजा सुरुवातीला आघाडीवर होत्या. त्यांना विद्यमान आमदार धर्मेंद्रसिंह जडेजा (हकुभा) यांची जागा देण्यात आली होती. काँग्रेसचे दिग्गज नेते बिपेंद्रसिंह जडेजा यांच्या विरोधात त्यांना उभे केले गेले आहे.

हे सुद्धा वाचा

“आप”चे उमेदवार खाताहेत काँग्रेसचीच मते; भाजपालाही भरभरून मतदान!

गुजरात निवडणूक : भाजपाची 150 जागांवर आघाडी

विधानसभा निवडणूक निकाल : गुजरातमध्ये भाजपची आघाडी; हिमाचलात काट्याची टक्कर

याक्षणी टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीनुसार, भाजप 151 जागी आघाडीवर असून काँग्रेस 21, तर आप 7 जागी आघाडीवर आहे. इंडिया टुडेनुसार भाजप 150, काँग्रेस 22, तर आप 7 जागांवर आघाडीवर आहे. न्यूज 18 नेटवर्कनुसार, भाजप 151, काँग्रेस 18, तर आप 8 जागी आघाडीवर आहे.

‘आप’ने काँग्रेसच्या मतांनाच सुरुंग लावल्याने भाजप गुजरातमध्ये ऐतिहासिक बहुमताकडे जाताना दिसत आहे. सुरुवातीच्या आघाडीवरून भाजप राज्याच्या सर्व विभागात मुसंडी मारण्याची चिन्हे दिसत आहे.
भाजपची आघाडी अशी :
उत्तर गुजरात : 45 (एकूण जागा 53)
सौराष्ट्र/कच्छ : 41 (एकूण जागा 51)
मध्य गुजरात : 35 (एकूण जागा 40)
दक्षिण गुजरात : 28 (एकूण जागा 35)

आघाडीवर असलेले प्रमुख उमेदवार :
झगडियामधून रितेश वसावा (भाजप)
खंभलियातून इसुदन गढवी (आप)
कलोलमधून बकाजी ठाकोर (भाजप)
गांधीनगर दक्षिणमधून अल्पेश ठाकोर (भाजप)
गांधीनगर उत्तरमधून रिताबेन पटेल (भाजप)
ढोलकामधून किरीटसिंह दाभी (भाजप)
दसडातून परशतोम परमार (भाजप)
वाधवणमधून जगदीश मकवाना (भाजप)
टंकारामधून दुर्लभजी देथरिया (भाजप)
जेतपूरमधून जयेश राडाडिया (भाजप)

पिछाडीवर असलेले प्रमुख उमेदवार :
झगडियातील आदिवासी नेते छोटू वसावा

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!