31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रराफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळली

राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका न्यायालयानं फेटाळली

लय भारी न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची गरज नसल्याचं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे. तसंच राफेल विरोधातील पुनर्विचार न्यायालयानं फेटाळून लावली. दसॉल्ट कंपनीकडून ही विमाने खरेदी करण्याच्या करारात पूर्वीच्या कराराच्या तुलनेत जास्त रक्कम खर्च झाली असून सगळी निर्णय प्रक्रियाच सदोष होती. याविरोधात माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरूण शौरी आणि प्रशांत भूषण यांनी पुर्नविचार याचिका दाखल केली होती.

देशातील बहुचर्चित ३६ राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी पुनर्विचार याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालायात याचिका दाखल करण्यात आली होती. फ्रान्सच्या दसॉल्ट अ‍ॅव्हीएशन कंपनीकडून राफेल जेट विमाने खरेदी करण्याच्या मुद्दय़ावर मोदी सरकारला निर्दोषत्व बहाल करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर दाखल करण्यात आलेल्या फेरविचार याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात गुरूवारी सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने राफेल विरोधातील पुनर्विचार याचिका फेटाळून लावली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी