31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रअजित पवार परत येतील का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या....

अजित पवार परत येतील का?, सुप्रिया सुळे म्हणाल्या….

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत सुप्रिया सुळे यांनी मोठे विधान केले आहे, पक्षातील काही जणांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याने त्यांच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. अजित पवार राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. मात्र त्यांनी देखील पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. आम्ही आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची वाट पाहत आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. सुळे म्हणाल्या लोकशाहीत एक नागरिक म्हणून अजित पवार यांनी निर्णय घेतला. मात्र ते परत येतील की नाही हे सांगू शकत नाही. मात्र पवार कुटुंब एक ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्न करु कुटुंबात राजकारण येणार नाही याची काळजी घेऊ असे देखील त्या म्हणाल्या.

अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील नऊ नेत्यांनी सरकारमध्ये सामील होत मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तसेच त्यांनी पक्ष आणि पक्षचिन्हावर देखील निवडणुक आयोगाकडे दावा केला आहे. एकीकडे अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात स्पर्धा सुरु असली तरी अनेक आमादार मात्र व्दिधा मनस्थितीत आहेत. अशातच शरद पवार यांनी मैदानात उतरुन राज्यभर दौरे सुरु केले आहेत. या सर्व घडामोडी घडत असतानाच गेल्या आठवड्यात अजित पवार आणि शरद पवार यांची पुण्यातील उद्योगपती चोरडिया यांच्या बंगल्यावर बैठक झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती.

या भेटीबद्दल देखील सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिले. त्या म्हणाल्या आम्ही गुप्तपणे कोणत्याही बैठका घेतलेल्या नाहीत. पवार आणि चोरडिया कुटुंबाचे दादा (अजित पवार) यांच्या जन्माआधीपासून मैत्रीचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी जाण्यात चोरी आणि भीती कसली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा 

सीमा देव यांना ठाण्याची मिसळच का आवडायची ?

अबब ! आठ इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या !!

मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

सुप्रिया सुळे म्हणाल्या, पक्षात फुट पडलेली नाही, काही जणांनी वेगळा निर्णय घेतला असून त्याबद्दल आम्ही विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार केली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये कोणताही संभ्रम नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

 

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी