31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeजागतिकब्रिक्सच्या शिखर परिषदेत मोठा निर्णय; या सहा राष्ट्रांचा होणार समावेश

ब्रिक्सच्या शिखर परिषदेत मोठा निर्णय; या सहा राष्ट्रांचा होणार समावेश

सध्या दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या ब्रिक्स (BRICS) ची वार्षिक शिखर परिषद सुरू आहे. या परिषदेच्या अंतिम दिवशी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ब्राझिल, रशिया. चीन, भारत आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश असलेल्या या परिषदेत आता अर्जेंटिना, इजिप्त, इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचादेखील पूर्ण सदस्य म्हणून स्वीकार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश असलेल्या BRICS च्या वार्षिक शिखर परिषदेच्या अंतिम दिवशी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी नवीन सदस्य म्हणून सहा देशांना ब्लॉकमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रित करण्याचा निर्णय जाहीर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्या समवेत असलेल्या रामाफोसा यांनी जोहान्सबर्ग येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, “१ जानेवारी २०२४ पासून नवीन सदस्यत्व ब्रिक्स मध्ये लागू होईल.

काय आहे ब्रिक्स?

ब्रिक्स राष्ट्रसमूहात दक्षिण आफ्रिका, ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या पाच राष्ट्रांचा समावेश आहे. ब्रिक्स समूहातील राष्ट्रे ही जगातील सर्वात वेगवान विकास दर असलेल्या पाच अर्थव्यवस्थांचा समूह म्हणून ओळखली जातात. या राष्ट्रसमूहाची स्थापना २००९ मध्ये झाली.

ब्रिक्स हे नाव प्रत्येक सदस्य राष्ट्राच्या पहिल्या अक्षरांवरून घेतले असून यामध्ये ब्राझीलचा B, रशियाचा R, भारताचा I, चीनचा C आणि दक्षिण आफ्रिकेचा S आहे. सुरवातीला या राष्ट्रसमूहात ४ सदस्य होते आणि तिचे मूळ नाव BRIC होते. त्यानंतर, २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश या संघटनेत झाल्यानंतर संघटनेचे नाव बदलून BRICS असे ठेवण्यात आले.

दरवर्षी, ब्रिक्स राष्ट्रसमूहाची औपचारिक शिखर परिषद घेतली जाते. या संघटनेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक राष्ट्राचे नेते या शिखर परिषदेला उपस्थित असतात.

हे ही वाचा 

अबब ! आठ इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या !!

IAS Transfer : कान्हूराजे बगाटे महानंदचे एमडी, डॉ. किरण पाटील बुलढाणा कलेक्टर !

संतापजनक: राज्य सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘अस्पृश्यते’ची वागणूक, हसन मुश्रीफ दखल घेतील का ?

ब्रिक्स संघटनेची स्थापना विविध कारणांसाठी झाली होती. शिक्षण विभागात सुधारणा करणे, विकसित आणि विकसनशील देशांमधील सामंजस्य राखणे, परस्पर देशांमध्ये राजकीय व्यवहार ठेवणे, सर्व विकसनशील राष्ट्रांना विकसित राष्ट्र बनण्यात मदत करणे, देशांमधील वाद परस्पर मिटवणे तसेच एकमेकांच्या देशाचे सांस्कृतिक संरक्षण करणे ही काही महत्वाची उद्दिष्टे आहेत.

डॉलर हे जगातील महत्वाचे चलन मानले जाते. ज्या प्रकारे डॉलर हे सर्वोच्च कॅलिबरचे चलन आहे, त्याचप्रमाणे इतर चलनांनाही बळकट केले पाहिजे तसेच सर्व विकसनशील राष्ट्रांना विकसित राष्ट्र बनण्यात मदत करणे, हे ब्रिक्स राष्ट्रसामूहाचे धोरण आहे.

आता, या बलाढ्य मानल्या जाणाऱ्या राष्ट्रसमूहात आणखी ६ देश सहभागी होणार आहेत त्यामुळे, येणाऱ्या काळात जागतिक पटलावर याचा काय परिणाम होतो हे पाहणे रंजक ठरेल.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी