25 C
Mumbai
Thursday, September 14, 2023
घरराष्ट्रीयअबब ! आठ इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या !!

अबब ! आठ इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या !!

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे तब्बल आठ इमारती कोसळल्या आहेत. कुल्लू जिल्ह्यातील अन्नी भागात गुरुवारी झालेल्या पावसामुळे आधीच असुरक्षित घोषित केलेल्या या इमारती पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याच्या विडिओज वायरल झाल्या आहेत. थरकाप उडवणाऱ्या या विडीओमध्ये भूस्खलनामुळे इमारती कोसळताच परिसरात धुळीचे ढग पसरल्याचे चित्र दिसत आहे. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून मालमत्तेचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.


या इमारतींमध्ये निवासी घरे, दुकाने, बँका आणि इतर व्यावसायिक कार्यालयांचा समावेश होता. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही दिवसांपूर्वीच या इमारतींना भेगा पडल्या होत्या आणि या इमारती असुरक्षित घोषित करण्यात आल्या होत्या. नुकत्याच त्या रिकाम्याही करण्यात आल्या होत्या.

तत्पूर्वी, भारतीय हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला होता, ज्यात गुरुवारपासून दोन दिवस हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीचा अंदाज होता.

हे ही वाचा 

मराठी अभिनेत्री सीमा देव यांचे निधन

चांद्रयानातील प्रज्ञान रोवर नक्की काय करणार?

संतापजनक: राज्य सरकारकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ‘अस्पृश्यते’ची वागणूक, हसन मुश्रीफ दखल घेतील का ?

हिमाचल प्रदेश सरकारने शेअर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्यात मान्सूनचे आगमन झाल्यापासून २४ जूनपासून सुरू असलेल्या पावसाच्या प्रकोपामुळे एकूण नुकसान ८००० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी