31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमहाराष्ट्रछगन भुजबळांमुळे कारण नसतांना तणाव : सुधीर मुनगंटीवार

छगन भुजबळांमुळे कारण नसतांना तणाव : सुधीर मुनगंटीवार

लोकशाहीमध्ये संयम अपेक्षित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्सेपशन आणि रिॲलिटी यामध्ये फरक असतो तो समजून घेतला पाहिजे.मात्र छगन भुजबळ हे कारण नसताना तणाव निर्माण करत आहेत असा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. कुसुमाग्रज स्मारक येथे ते पत्रकारांशी ते बोलत होतेमुनगंटीवार यांनी आपला विचार हाच सत्य आहे असे प्रत्येक नेता आग्रह पूर्वक सांगत असतो. ओबीसी आरक्षणला धक्का लागणार नाही असे फडणवीस सांगताय, बावनकुळे सांगताय मात्र भुजबळ जे काही सांगतात त्याचीच का बातमी होते असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात मात्र त्यावेळी ताणतणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. झुंडशाहीने कायदे बदलत नाहीत असे भुजबळ म्हणाले मात्र मनोज जरांगे पाटील लोकशाही मार्गाने आले होते असे मुनगंटिवार म्हणाले.

लोकशाहीमध्ये संयम अपेक्षित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पर्सेपशन आणि रिॲलिटी यामध्ये फरक असतो तो समजून घेतला पाहिजे.मात्र छगन भुजबळ हे कारण नसताना तणाव निर्माण करत आहेत असा टोला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला. कुसुमाग्रज स्मारक येथे ते पत्रकारांशी ते बोलत होते मुनगंटीवार यांनी आपला विचार हाच सत्य आहे असे प्रत्येक नेता आग्रह पूर्वक सांगत असतो. ओबीसी आरक्षणला धक्का लागणार नाही असे फडणवीस सांगताय, बावनकुळे सांगताय मात्र भुजबळ जे काही सांगतात त्याचीच का बातमी होते असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.

असे प्रकार राजकारणात यापूर्वी मराठा आरक्षण बद्दल घडले आहेत जसे  पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांचे आणि शरद पवार यांची मते विभिन्न होती. राजकारणात असे अनेक प्रसंग येतात मात्र त्यावेळी ताणतणाव येणार नाही याची काळजी घ्यावी. झुंडशाहीने कायदे बदलत नाहीत असे भुजबळ म्हणाले मात्र मनोज जरांगे पाटील लोकशाही मार्गाने आले होते असे मुनगंटिवार म्हणाले.
 आम्ही देखील ओबीसी, मराठा,अनुसूचित जातीचे एल्गार मेळावे घेतले आहेत आता भुजबळ देखील मेळावे घेत आहेत त्यात वाईट काही नाही कारण मेळावा घेणे म्हणजे भांडणे लावणे असे नव्हे असे मुनगंटीवार म्हणाले.
भुजबळांना भीती वाटत होती की ओबीसीचे आरक्षण जायला नको.मात्र मला जी भूमिका भुजबळ यांची माहिती आहे .ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांना मराठा आरक्षण देण्यावर त्यांचा आक्षेप आहे.
प्रकाश आंबेडकर कोणाचेच नाहीत कारण काँग्रेस त्यांना घ्यायला तयार नाहीत असे सांगत असताना त्यांनी इंडिया आघाडीची अवस्था तुकडे हजार झाले अशी अवस्था झाली आहे.
राजकीय लोकांनी महाराज होऊ नये
शंतिगिरी महाराज लोकसभा लढवणार आहेत हे मला माहीत नाही.मात्र महाराज राजकारणात आले तर चालतील
मात्र राजकीय लोकांनी महाराज होऊ नये असे मुनगंटीवार म्हणाले.
गंगाआरती सारखी गोदारती व्हावी
पुरोहित संघाचा गोदा आरतीला विरोध नाही मात्र ही आरती कुणाचे अधिकार काढण्यासाठी नाही.आमदार देवयानी फरांदे , सीमा हिरे यांनी वारानशीच्या धर्तीवर नाशिक मध्ये गोदा आरती व्हावी असा प्रस्ताव मांडला होता. मोठा निधी लागणार असल्याने त्याबाबत स्मार्ट सिटीशी चर्चा करण्यात आली .यातील निधीचे योग्य नियोजन करण्यात येणार असून गंगा आरती प्रमाणे गोदा आरती देखील झाली पाहिजे असे मुनगंटीवार म्हणाले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी