PM Narendra Modi : हे सरकार गोरगरीबांना हालअपेष्ठांमध्ये सोडणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी इन-सीटू झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाच्या अंतर्गत दिल्लीतील कालकाजी येथे 3024 नव्या सदनिकांचे उद्घाटन करत गरीब कटुंबांना पक्क्या घरांची चावी सुपूर्द केली. यावेळी बोलताना ते म्हणाले, हजारो झोपडपट्टीवासियांसाठी आजचा दिवस खुप मोठा दिवस आहे. कालकाजी एक्सटेंशनच्या पहिल्या फेजमध्ये 3000 हून अधिक घरांची निर्मिती करण्यात आली आहे.

पंतप्रधान म्हणाले, दिल्लीमधील हजारो परिवार आणि हजारो गरीब बंधु-भगिनींसाठी हा खूप मोठा दिवस आहे. गेली अनेक वर्षे जी कुटुंबे दिल्लीतील झोपड्यांमध्ये राहत होती, त्यांच्या नव्या जीवनाची आता सुरूवात होत आहे. आज देशात जे सरकार आहे ते गरीबांचे सरकार आहे, त्यामुळे गोरगरीबांना हाल अपेष्ठांमध्ये हे सरकार सोडणार नाही.

यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आजच्या काळात देशाच्या धोरण आणि निर्णयांचा केंद्रबिंदू हा गरीब आहे. शहरात राहणाऱ्या गरीबांकडे आमचे सरकार लक्ष देते. दिल्लीत 40 लाखांहून अधिक गरीबांना विमा कवच सरकारने दिले आहे. त्याच बरोबर औषधांवरील खर्च कमी करण्यासाठी ‘जन औषधी केंद्र’ देखील सरकारने सुरू केली आहेत. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, जेव्हा जीवनात सुरक्षा असते तेव्हा गरीब लोक गरीबीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतात.
हे सुद्धा वाचा:
Andheri East Bypoll Election : अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत ऋतुजा लटकेंना सहा उमेदवारांचे आव्हान; गुरुवारी होणार मतदान

Nitesh Rane : उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री नाहीत लक्षात ठेवा, नितेश राणेंचा हल्लाबोल

Shah Rukh Khan Birthday : पडद्यावरच नाही तर रिअर लाईफ मध्ये सुद्धा ‘बादशहा’च!
पंतप्रधान म्हणाले, दिल्लीला सर्व सुविधांयुक्त शहर बनविण्याचे लरकाचे लक्ष्य आहे. आम्ही दिल्लीला राजधानीचे शानदार आणि सर्वसुविधांयुक्त शहर बनवू. दिल्लीच्या विकासाला गती देण्यासाठी आम्ही जे काम केले आहे ते दिल्लीतील लोक पाहत आहेत. 2024 मध्ये जेव्हा आमचे सरकार आले होते. तेव्हा दिल्ली-एनआरसीमध्ये फक्त 190 किलोमीटरच्या अंतरावरच मेट्रो धावत होती. आता मेट्रोचा विस्तार वाढून जवळपास 400 किलोमीटर पर्यंत पोहचला आहे.

प्रदीप माळी

Recent Posts

शिवसेनेची १५ जागा पदरी पाडून सरशी

लोकसभेच्या राज्यातील शेवटच्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जेमतेम २ दिवसांचा कालावधी उरला असताना ठाणे…

38 seconds ago

अक्रोड खाण्याचे फायदे

अक्रोड हा अत्यंत पौष्टिक असा सुकामेवा असून यामध्ये हेल्दी फॅट, प्रोटिन्स, फायबर, मिनरल्स आणि व्हिटॅमिन्सचे…

1 hour ago

ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टारचा वापर’ भाजपच्या आरोपाने खळबळ

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. त्यातच आता भाजपने एक…

3 hours ago

आरटीई अर्ज भरण्यासाठी १० मे पर्यंत मुदतवाढ

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी प्राथमिक शिक्षण…

3 hours ago

नाशिक येथे एमएचटी-सीईटी (पीसीबी) ग्रुपची परीक्षा पार

एमएचटी-सीईटी परीक्षेतील भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) (MHT-CET (PCB)) ग्रुपची परीक्षा (exam) पार पडली आहे.…

4 hours ago

गंगापूर धरणात दूषित पाणी; नाशिककरांच्या आरोग्यास धोका

गंगापूर धरण (Gangapur dam) हे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे प्रमुख धरण आहे. या धरणाद्वारेच होणारा…

4 hours ago