31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeजागतिकजपानच्या ‘शॉर्ट शॉर्ट्स’ महोत्सवात नाशिक धामणगाव येथील लघुपट ‘वेणी’चा वर्ल्ड प्रीमियर

जपानच्या ‘शॉर्ट शॉर्ट्स’ महोत्सवात नाशिक धामणगाव येथील लघुपट ‘वेणी’चा वर्ल्ड प्रीमियर

धामणगाव (ता. येवला) येथे स्थित दिग्दर्शक-लेखक विशाल जेजूरकर यांचा लघुपट ‘वेणी’चे विश्वविख्यात ऑस्कर पुरस्कारासाठी पात्रता म्हणून ओळख असलेल्या टोकियो (जपान) येथील प्रतिष्ठित ‘शॉर्ट शॉर्ट्स’ लघुपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. या वर्षी जगभरातून सुमारे पाच हजार प्रवेशिकांच्या माध्यमातून दाखल झालेल्या फक्त २५ चित्रपटांमधून ‘वेणी’ची आशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते विशाल जेजूरकर यांना लघुपट महोत्सवाने टोकियो येथे लघुपटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

धामणगाव (ता. येवला) येथे स्थित दिग्दर्शक-लेखक विशाल जेजूरकर यांचा लघुपट ‘वेणी’ (‘Veni’) चे विश्वविख्यात ऑस्कर पुरस्कारासाठी पात्रता म्हणून ओळख असलेल्या टोकियो (जपान) (Japan) येथील प्रतिष्ठित ‘शॉर्ट शॉर्ट्स’(Short Shorts) लघुपट महोत्सवात वर्ल्ड प्रीमियर होणार आहे. या वर्षी जगभरातून सुमारे पाच हजार प्रवेशिकांच्या माध्यमातून दाखल झालेल्या फक्त २५ चित्रपटांमधून ‘वेणी’ची आशिया आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात निवड झाली आहे. या चित्रपटाचे निर्माते विशाल जेजूरकर यांना लघुपट महोत्सवाने टोकियो येथे लघुपटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आमंत्रित केले आहे.(Nashik Dhamangaon short film ‘Veni’ has world premiere at Japan’s Short Shorts Festival)

वेणी ही फिल्म धामणगाव ग्रामीण पार्श्वभूमीतून येणारे चित्रपट दिग्दर्शक विशाल जेजूरकर आणि राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या अभिनेत्री अंजली पाटील यांच्यातील सहयोग आहे. अंजली पाटील यांनी ‘वर्षा’ची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. तसेच त्यांच्या अनाहत फिल्म्स या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत या चित्रपटाची निर्मितीदेखील केली आहे. हा लघुपट साकार करण्यासाठी दिग्दर्शकाला दोन वर्षे वाट पाहावी लागली. वेणीचे चित्रीकरण एप्रिल २०२३ मध्ये मुंबईत अवघ्या तीन दिवसांच्या वेळापत्रकात झाले होते. चित्रपटनिर्मिती सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाली. ‘वेणी’ फिल्मची कथा तिशीतली गृहिणी ‘वर्षा’च्या अस्ताव्यस्त दैनंदिन दिनचर्येचा मागोवा घेते.

ई.एफ.एल. (इको फ्रेंडली लाइफ), ठाणेचे संस्थापक अशोक जगझाप आणि पुण्यातील लेखिका अदिती केळकर हेदेखील या चित्रपटाला सहनिर्माते म्हणून लाभले आहेत. वेणीच्या कथेची कल्पना विशाल जेजूरकर यांना लॉकडाउनमध्ये सुचली होती आणि सहलेखिका स्नेहल कल्पना यांच्या सहकार्याने २०२२ मध्ये ही पटकथा लिहिली गेली.हा लघुपट साकार करण्यासाठी दिग्दर्शकाला दोन वर्षे वाट पाहावी लागली. वेणीचे चित्रीकरण एप्रिल २०२३ मध्ये मुंबईत अवघ्या तीन दिवसांच्या वेळापत्रकात झाले होते. चित्रपटनिर्मिती सप्टेंबर २०२३ मध्ये पूर्ण झाली.

हा चित्रपट शहरी वातावरणात निम्न मध्यमवर्गीय कुटुंबाला भेडसावणारी आव्हाने, अल्झायमरने ग्रस्त असलेल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेण्याचा भावनिक प्रवास, व्यक्तिमत्त्वावर असलेला आठवणींचा सखोल प्रभाव, वेदनादायक भूतकाळचे प्रदीर्घ टिकणारे परिणाम, पुरुष संततीला प्राधान्य देण्यासाठी भारतात असलेला सामाजिक दबाव, गर्भधारणा आणि मातृत्व यांसारख्या अनेक विषयवस्तू सहजपणे हाताळतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी