विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 17 विधेयके मार्गी

महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता संस्थगित झाले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 17 विधेयके मार्गी लागली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात चांगले काम झाल्याचा दावा सरकारने केला. सन 2023 चे पावसाळी अधिवेशन सोमवार दिनांक 17  जुलै, 2023 रोजी मुंबई येथे होईल.

महाराष्ट्र विधिमंडळाचे सन 2023 चे अर्थसंकल्पीय अधिवेशन

दोन्ही सभागृहात संमत विधेयके – 17
विधान परिषदेत प्रलंबित – 01
विधानसभेत प्रलंबित – निरंक
संयुक्त समितीकडे विधेयके – 01
मागे घेण्यात आलेली विधेयके – 01

 

दोन्ही सभागृहात संमत विधेयके

(1) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)
(2) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधीकरण विधेयक, 2023. (वैद्यकीय शिक्षण विभाग)
(3) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2023 (नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत) (नगर विकास विभाग)
(4) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2023 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (ग्राम विकास विभाग)
(5) महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण विधेयक, 2023 (सामान्य प्रशासन विभाग)
(6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (विद्यापीठांचे कुलगुरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता सुधारणा करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(7) महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)
(8) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2023. (वित्त विभाग)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत अधिवेशनातील कामगिरीची माहिती देत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गालातल्या गालात हसत होते.

फेसबुकवर संबंधित व्हिडिओ पाहा

(9) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग)
(10) पंढरपूर मंदिरे (सुधारणा) विधेयक, 2023 (विधि व न्याय विभाग)
(11) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)
(12) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) (सुधारणा)
(13) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना (सुधारणा) विधेयक, 2023 (विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत) (नगर विकास विभाग)
(14) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
(15) महाराष्ट्र गोसेवा आयोग विधेयक, 2023
(16) महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, 2023. (विशेष पोलीस आयुक्त या पदाच्या संदर्भाचा समावेश करण्यासाठी वैधानिक तरतुद करणे) (गृह विभाग)
(17) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2023 (कोविड-19 वैश्विक साथरोग राहिलेला नसल्याने त्या अनुषंगाने कलम 73अअअ मध्ये केलेली सुधारणा वगळणेबाबत.) (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)
विधान परिषदेत प्रलंबित
(1) स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2022 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
संयुक्त समितीकडे विधेयके
(1) महाराष्ट्र लोक आयुक्त विधेयक, 2022 (सामान्य प्रशासन विभाग))
मागे घेण्यात आलेली विधेयके
(1) महाराष्ट्र उद्योग, व्यापार व गूंतवणूक सुविधा विधेयक, 2023. (उद्योग, ऊर्जा व कामगार) (महाराष्ट्र राज्यात औद्योगिकीकरणाला चालना देण्यची गरज लक्षात घेता, राज्यात अधिकाधिक गुंतवणुक आकर्षित करणेसाठी तसेच राज्यमध्ये व्यवसाय सुलभीकरण करण्यासाठी उद्योजकांना आवश्यक असलेले परवाने, संमती विहीत वेळेत मिळवण्यासाठी तसेच त्याद्वारे उद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी एक खिडकी योजनेला वैद्यानिक दर्जा मिळवण्याची तरतुद करण्याकरिता विधेयक)

हे सुद्धा वाचा : 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विरोधक-सत्ताधारी पुन्हा एकदा आमनेसामने..!

हे तर चोरांचे विधिमंडळ, राऊतांच्या विधानावर भाजपचा हल्लाबोल

हक्कभंगाच्या कारवाईला मी घाबरत नाही, संजय राऊत

Maharashtra Assembly, Budget Session, Shinde Fadanvis, 17 bills passed, Mansoon Session

 

विक्रांत पाटील

Recent Posts

नाना पाटोलेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची संधी…

लोकसभा निवडणुकीत नागपूर आणि महाराष्ट्रात काँग्रेसचे अधिकाधिक खासदार निवडून आल्यास नाना पटोले (Nana Patole) यांना…

12 hours ago

शहरातील खोदकामाना मनपाचा १५ मे चा अल्टिमेटम

महापालिका वा स्मार्ट सिटी दोन्हींच्या समन्वयाने शहरात ठिकठिकाणी विविध कामे सुरू आहेत. त्यात एमजीएनएलची गॅसवाहिनी,…

12 hours ago

नाशिक महापालिकेत तब्बल ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा

राज्यात एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे…

12 hours ago

घोटी-सिन्नर महामार्गावरील मोटारसायकलींना अज्ञात वाहनाची धडक; दोघांचा मृत्यू, ३ जखमी

घोटी-सिन्नर महामार्गावरील साकुर फाट्यावरील कोठुळे लॉन्सजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली…

13 hours ago

गुंतवणूकदारांच्या फसवणूक प्रकरणी ईडीची कारवाई

गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची…

13 hours ago

चोरट्यांचा सेफ्टी लॉकरवर डल्ला: कोट्यावधी रुपयांचे दागिने लंपास

जुना गंगापूर नाका येथील आयसीआयसीआय होम फायनान्स कंपनीत शिरुन चाेरट्यांनी (Thieves) सेफ्टी लॉकरमधून ४ कोटी…

13 hours ago