31 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरराजकीयअर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विरोधक-सत्ताधारी पुन्हा एकदा आमनेसामने..!

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा; विरोधक-सत्ताधारी पुन्हा एकदा आमनेसामने..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. दरम्यान 27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत हे अधिवेशन (Maharashtra Budget session) पार पडत आहे. आज या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आहे. महागाईचा निर्देशांक सतत वाढत असून मध्यमवर्गीयांना घर खर्च भागविताना दमछाक होत आहे. तरुणांना बेरोजगारीचा प्रश्न भेडसावत आहे. राज्याच्या तिजोरीतील महसूल आणि खर्च यांचा ताळमेळ बसविणे सरकारला कठीण होत चालले आहे. राज्यासमोर अशा अनेक समस्या उभ्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज पुन्हा विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येणार आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरु होत आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज चर्चा होमार आहे. तसेच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन तसेच जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दोन्ही मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज विधानसभेत चर्चा होणार आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळी मुळे नुकसान झाला आहे. तर पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत 76 जनावरे देखील या अवकाळी पावसामुळे दगावले आहेत. आता विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा:

संप अधिक चिघळणार? आक्रोश मोर्चा काढण्याचा संपकऱ्यांचा इशारा

अखेर पाच दिवसानंतर लाल वादळ शमलं..!

आजपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज वादळी ठरणार?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी