राजकीय

विरप्पन गँगने महापालिका लुटली कॅगच्या अहवालातून स्पष्ट : संदीप देशपांडे

आम्ही गेले 5 वर्ष बोलत होतो. विरप्पन गँगने पालिका लुटण्याचं कामं केलं आहे. जे आम्ही बोलत होतो त्यावर शिक्कामोरताब करण्याचं कामं कॅगने केलं आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली आहे.

पालिकेचे स्वतःच ऑडिट खातं आहे.महापालिकेचं ऑडिट खातं झोपा काढत होत का?अनियमिता दिसली नाही त्यांना.याचा पाठपुरावा होणं गरजेचं आहे. याचा FIR EWO कडे नोंदवला पाहिजे. संबंधित लोकांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ही देशपांडे यांनी केली आहे.

मिठी नदी बाबत बोलायचं झाल्यास, सातत्याने मनसेने या गोष्टी मांडल्या आहेत.मिठी नदीचं सफाईकरण हाच सगळ्यात मोठा घोळ आहे. आमची मागणी होती cctv लावायची पण cctv लावले नाहीत. ही सगळी विरप्पन गँगची खेळी आहे. याच्यापाठी त्यांचा हात आहे, असं संदीप देशपांडे म्हणाले.

उध्दव यांनी राहुल गांधी यांना उद्देशून काही वक्तव्य केले आहे. ते म्हणजे सगळी मॅच फिक्सिंग आहे. उद्या परत बोलले तर फक्त अग्रलेख लिहिणार का? घरी बसून अंडी उबवणार का? कारवाई काय करणार? महाविकास आघाडीतून बाहेर येणार आहेत का, असे प्रश्न ही त्यांनी उपस्थित केले आहेत.

मनसे नेते अविनाश जाधव यांना धमक्या आल्या आहेत.आम्ही अश्या धमक्याना भीक घालत नाही. सरकारने कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ठोस पाऊल उचली पाहिजे. महाराष्ट्र सैनिक दक्ष आहे आणि आम्ही लढा उभारू, असा इशारा ही त्यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा :

अन् मुख्यमंत्री शिंदे थेट मनसे कार्यालयात; राजकीय चर्चेला उधान!

संदीप देशपांडे हल्ला प्रकरण : महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार सेनेच्या उपाध्यक्षाला अटक

उद्धव ठाकरे-केजरीवाल एकसाथ; मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढणार?

सुधाकर काश्यप

Recent Posts

स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज यांचा उमेदवारी अर्ज दाखल

महंत शांतिगिरी महाराज यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केल्यांनतर मंगळवारी महन्त सिद्धेश्वरानन्द सरस्वतीजी महाराज यांनी…

5 mins ago

राजाभाऊ वाजे १४ कोटीं ८० लाखांचे धनी

नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार पराग (राजाभाऊ) वाजे (Rajabhau Waze) यांच्याकडे जंगम (चल) व…

27 mins ago

नाशिकमध्ये झाडाच्या बुंध्यांना कांक्रीटीकरण

स्मार्ट सिटीच्या सुशोभीकरणासाठी पदपथांचे काम करताना अनेक झाडाच्या बुंध्याला ( tree trunks) सिमेंटचा (Concretisation) वेढा…

44 mins ago

शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेश प्रक्रियेचे नियम बदल केल्याने पालकांची नाराजी

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) ( RTE admission) प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाकडून मोठा बदल केल्याने आरटीई…

1 hour ago

काँग्रेसने पंतप्रधान मोदींना विचारले हे सवाल

आज पंतप्रधान मराठवाड्यात येत आहेत आमचे काही त्यांना प्रश्न: 1. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या  झालेल्या दुरवस्थेकडे पंतप्रधानांचे…

2 hours ago

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कांद्यावर बोलणार? १० मे रोजी पिंपळगावला सभा

कांदा (onions) काढणीचे काम वेगात सुरू झाले असताना व्यापारी, हमाल मापाडी व बाजार समित्यांच्या वादात…

16 hours ago