31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रप्रतापगडाच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाला राज्यपालांनी केले निलंबित

प्रतापगडाच्या मुद्द्यावरून ग्रामपंचायतीतील ग्रामसेवकाला राज्यपालांनी केले निलंबित

­

टीम लय भारी

पाचगणी : माजी महामहिम राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी मराठ्यांचा इतिहासाची साक्ष देणा-या किल्ले प्रतापगड ला भेट दिली. यावेळी गडावर पर्यटकांन साठी असलेल्या अपु-या सोई सुविधा व सर्वत्र असलेल्या अस्वच्छते बद्दल प्रचंड नाराजी व्यक्त केली. (C Vidyasagar rao suspended a gramsevak because of pratapgad)

तसेच संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ निलंबन करण्याचे आदेश राज्यपालांनी दिले.

जयंत पाटलांसाठी लावले शहरभर बॅनर

‘व्हिडीओ क्लिप मध्ये ऐकू येणारा आवाज माझा नाही’

अतिवृष्टी च्या काळात ही ग्रामसेवकाना केलेल्या कर्तव्यामध्ये कसूर व किल्ले प्रतापगडावर असणाऱ्या अस्वच्छतेचा दुर्गंधीचा प्रभाव किल्ले प्रतापगडावर भेट दिलेल्या महामहीम राज्यपालांनी पाहिल्यानंतर या सर्व प्रकारावर राज्यपाल भडकले आणि येथील जबाबदार ग्रामपंचायतीच्या प्रशासनावर चांगलेच ताशेरे ओढले.

कोण आहे तो स्थानिक ग्रामपंचायतीचा प्रशासक ग्रामसेवक असे विचारले. सर्व स्वच्छतेची तपासणी केल्यानंतर संबंधित ग्रामसेवकाला तात्काळ निलंबित करा असा आदेश देखील राज्यपालांनी दिला होता. मात्र त्या राज्यपालाच्या आदेशाची अद्यापही अंमलबजावणी आजपर्यंत केली गेली नाही.

याबाबत आता सर्वसामान्य नागरिकांकडून प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. गेले १२ वर्ष सदर ग्रामसेवक आज देखील ग्रुप ग्रामपंचायत प्रतापगड कुंभरोशी येथे कार्यरत आहे. एक ग्रामसेवक एकाच ग्रामपंचायतीत सलग १२ वर्ष कार्यरत होता. येथे एकमेव ग्रामसेवक असल्याची चर्चा सर्व सामान्य माणसातुन निषेध व्यक्त होत आहे.

तसेच संबंधित ग्रामसेवकांनी प्रतापगड वाडा कुंभरोशी परिसरात पण पाण्याच्या नावावर जमिनी घेतल्या असल्याची चर्चा आता दबक्या आवाजात सुरू आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी बारा वर्ष काम करणाऱ्या या ग्रामसेवकावर नेमकी कोणाची मेहेरनजर आहे याबाबत आता सर्वसामान्य जनता प्रश्न विचारू लागली आहे.

अखेर विजय वडेट्टीवारांविरोधी आंदोलनाला सुरुवात

Vidyasagar rao

Amid widening rift between Shiv Sena & BJP, Uddhav showers praise on Gadkari

त्यावेळचे महामहिम राज्यपाल यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी देखील करण्यात आली नाही. म्हणजेच या ग्रामसेवकाच्या मागे नक्कीच बड्या अधिकारी व राजकीय व्यक्तींच्या वरद हस्त असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी व्हावी अशी मागणी देखील आता होऊ लागली आहे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी