31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीय'व्हिडीओ क्लिप मध्ये ऐकू येणारा आवाज माझा नाही'

‘व्हिडीओ क्लिप मध्ये ऐकू येणारा आवाज माझा नाही’

टीम लय भारी

मुंबई : किरीट सोमैयांची पत्रकार परिषद संपल्यानंतर त्यांना माझ्याकडे घेऊन या, असे म्हणताना शिवसेनेचे नेते व माजी मंत्री रामदास कदम यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ह्या व्हिडिओतील आवाज माझा नाही म्हणत कदम यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. (Ramdas kadam declined his own voice in video clip)

कुणीतरी आपल्या आवाजाची हुबेहुब नक्कल करून खोटी व्हिडीओ क्लिप बनवून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचे कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

हिंदूंची भारताबाहेरील मंदिरे आणि त्यांच्या भव्यतेचा इतिहास

अखेर विजय वडेट्टीवारांविरोधी आंदोलनाला सुरुवात

अनिल परब आणि शिवसेना प्रमुखांचा माझ्यावर विश्वास आहे तसेच अनिल परब आणि माझे संबंध चांगले आहेत.

आमच्यातील चांगले संबंध बिघडवण्यासाठी कुणीतरी मुद्दामहून हा खोटेपणा करत असल्याचा दावा कदम यांनी केला.

किरीट सोमैया शिवसेनेच्या मुळावर उठलेले आहेत, त्यांना मी माझ्याकडे कशासाठी बोलवू असा प्रश्न पत्रकारांसमोर उपस्थित करताना कदम पुढे म्हणाले, संजय कदम आणि खेडेकर हे दोन्ही नेते माझ्या हाताखाली तयार झाले आहेत व आता माझी प्रतिमा पक्षात मालिन करण्याचे काम करत आहेत.

या खोट्या व्हिडीओ क्लिप विरोधात कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

मला माझ्या नेत्याला राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसलेलं बघायचंय; खासदार अमोल कोल्हेंचं वक्तव्य

Ramdas kadam

शिवसेना में भूकंप! मंत्री अनिल परब के ख़िलाफ़ ED की कार्रवाई में शिवसेना नेता का ही हाथ? BJP नेता किरीट सोमैया से संपर्क में थे

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी