31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणासाठी कटू निर्णय घेण्याची गरज; विजय वडेट्टीवार

कोकणासाठी कटू निर्णय घेण्याची गरज; विजय वडेट्टीवार

टीम लय भारी

मुंबई:- महाराष्ट्रातील पंधरा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. घरे वाहून गेलीत, मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे, तर दुसरीकडे निसर्गाचे वरदान लाभलेल्या कोकणातही अक्रित घडले. आपत्तीग्रस्तांना मदत करत असतांना कोकणासाठी कटू निर्णय घेण्याची गरज असल्याचे मला तरी वाटते, असे महत्त्वाचे भाष्य मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे (Vijay Vadettiwar said I think a bad decision needs to be taken for Konkan).

वारंवार घडणार्‍या या घटनांचा विचार करता शासन मदत करणारच आहे, पण यावर कायमस्वरुपी काय उपाययोजना करायच्या यावरही विचार सुरु आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळून 2 वर्ष पूर्ण; रुपाली चाकणकरांनी केली ‘ही’ खास पोस्ट

संजय राऊत यांचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

कोकण हा इको सेंसेटीव्ह झोन जाहीर करण्याची शिफारस गाडगीळ समितीने केली आहे. त्यामुळे नैसर्गिक वैभवाला छेडछाड केली तर असे परिणाम भोगावे लागतात. त्यामुळे कटू निर्णय घेण्याची गरज मला तरी वाटते, असे वडेट्टीवार म्हणाले.

एनडीआरएफ, एसडीआरएफ टीम वेळेवर पोहचल्या नाहीत अशा तक्रारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरुपी टीम तैनात केल्या पाहिजेत, असा विचार आहे. जिल्हा स्तरावरील आपत्ती व्यवस्थापन केंद्र बळकट करणे, याबद्दलही विचार सुरु आहे, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी विकणार ‘या’ सरकारी कंपनीतील हिस्सेदारी

At heart of Maharashtra floods, a Konkan river that can ‘drown the world’. But there’s more

आता नुकसानग्रस्तांना काय मदत करता येईल याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. शेतीचे नुकसान झाले आहे, रस्ते, वीजेचे नुकसान झाले आहे, या सगळ्यांबद्दल मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होणार आहे. डोंगराच्या पायथ्याशी असलेली गावे, पूर रेषेत असलेले गावे यांचे पुनर्वसन करणे याबाबतही चर्चा होणार आहे. असेही वडेट्टीवार यांनी सांगितले (Vijay Vadettiwar said that we will have discussions with Chief Minister Uddhav Thackeray).

Vijay Vadettiwar I think bad decision need take Konkan
पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

तसेच रस्त्याला 1600 ते 1700 कोटी, वीजेचे नुकसान झाले, त्याला ५०० कोटी खर्च येण्याची शक्यता आहे, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

ज्या गावाचे पुनर्वसन करायचे ती घरे म्हाडाने बांधावी आणि तिथल्या नागरी सुविधा शासन देईल असा विचार आहे. तीन टप्प्यात यांचे पुनर्वसन होण्याची आवश्यकता आहे. दरडी खालील गावे शोधण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सौम्य धोकादायक गावे कोणती? तसेच कायम पूर येतो अशा गावाचा शोध घेऊन त्यांचे पुनर्वसन करणे असे तीन टप्प्यात हे काम करायचे आहे, असे विजय वडेट्टीवारांनी सांगितले आहे ( Vijay Vadettiwar said The work is to be done in three phases, one of which is to rehabilitate the flood-prone village).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी