33 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयसंजय राऊत यांचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

संजय राऊत यांचा राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल

टीम लय भारी

मुंबई :- शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. भगतसिंह कोश्यारी पूरग्रस्त भागांची पाहणी करायला गेले आहेत. त्यांच्यासोबत निलंबित आमदार आशिष शेलारही आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. राज्यपाल नेहमी घटनेचे पुस्तक चाळूनच काम करतात. या पुरात घटनेचे पुस्तक वाहून गेले का ते मला पाहावे लागेल, असा संताप संजय राऊत यांनी व्यक्त करत हल्लाबोल केला आहे (Sanjay Raut attack on Governor Bhagat Singh Koshyari).

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दौऱ्यावर थेट हल्ला चढवला. राज्यपाल हे नेहमी घटनेचे पुस्तक चाळून काम करतात. या पुरात घटनेचे पुस्तक वाहून गेले का मला पाहावे लागेल.

राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना अडीच कोटींची मदत; शरद पवार

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. आपल्या एक दिवसाच्या दौऱ्यात राज्यपाल तळिये व चिपळूणला भेट देणार आहेत.

Sanjay Raut attack on Governor Bhagat Singh Koshyari
राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचा हेलिकॉप्टरमधून दौरा

घटनेनुसारच काही आमदारांचे निलंबन झाले आहे. ज्या पद्धतीने विधिमंडळात काही आमदारांनी गोंधळ घातला, हंगामा केला, दंगल केली. राजदंडाला हात घातला हे वर्तन घटनाबाह्य असल्याने विधानसभा अध्यक्षांनी त्यांचं निलंबन केलं. याचा अर्थ राज्यपाल विधानसभेचे अधिकार मानायला तयार नाहीत. विधानसभेचे अस्तित्व आणि घटनेने दिलेले अधिकार राज्यपाल मानत नसतील. त्या संदर्भात सरकार काय करते ते पाहावे लागेल, असे संजय राऊत म्हणाले (Sanjay Raut said the governor was not ready to accept the powers of the assembly)

राज्यपालांना जास्त समजते असे मी मानतो. आताच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले त्याप्रमाणे निलंबित आमदारांना घेऊन राज्यपाल गेले आहेत. तर ते नक्कीच जास्तीत जास्त मदत आणतील असे आम्ही मानतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

साडेचार वर्षाच्या आयुषकडून उध्दव ठाकरेंना अनोखी सलामी

Maharashtra Flood crisis: Sanjay Raut says, rich people should now come forward to help

महाड दुर्घटनेला केंद्र सरकार जबाबदार नाही

महाड दुर्घटनेला केंद्र सरकार जबाबदार आहे, असे शिवसेनेने म्हटल्याचे त्यांना विचारताच राऊत भडकले. महाड दुर्घटनेला कोणीही केंद्र सरकारला जबाबदार धरलेले नाही. हे चुकीचे विधान आहे. ही नैसर्गिक आपत्ती आहे, त्याचा केंद्राशी काय संबंध? केंद्र आणि राज्याने एकत्र येऊन या आपत्तीतून लोकांना सावरून न्यावे, अशी भूमिका आम्ही मांडलेली आहे. याचा अर्थ केंद्राला या घटनेला जबाबदार धरले असे होत नाही, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले (The Center has not been held responsible for the incident, said Sanjay Raut).

उद्धव ठाकरेंनी देशाचे नेतृत्व करावे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीत जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ते देशातील मोठे नेते आहेत. देशातील 11 कोटी जनतेचे ते आशास्थान आहे. तेही त्यांच्याकडे अपेक्षने पाहतात ही माझी भावना आहे. वाढदिवस साजरा करू नका असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आम्ही त्यांचा वाढदिवस साजरा करत नाही. मात्र, आमच्यासारखे काही नेते येऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत, असे सांगतानाच त्यांनी देशाचे नेतृत्व करावे अशी आमची इच्छा आहे, असे संजय राऊत म्हणाले (We want Chief Minister Uddhav Thackeray to lead the country, said Sanjay Raut).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी