35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रविराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रेकॉर्डतोड निधी; पाहा काय केलं पुढे...

विराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रेकॉर्डतोड निधी; पाहा काय केलं पुढे…

टीम लय भारी

मुंबई :- संपूर्ण देशात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव झपाटयाने वाढत आहे. कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या कोरोनाच्या (Corona) भीषण परिस्थितीत आरोग्याच्या सुविधा देखील अपुऱ्या पडत आहे. अशा या कोरोनाच्या (Corona) भीषण परिस्थितीत विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Kohli and Anushka Sharma) कोरोना (Corona) लढ्यात हातभार लावण्यासाठी एक चळवळ उभी केली. या चळवळीत विराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रेकॉर्डतोड निधी (Virat-Anushka raises record-breaking funds for Corona fight).

विराट व अनुष्का (Virat-Anushka) यांनी Ketto सोबत आठवडाभरापूर्वी एक मोहीम सुरू केली आणि सुरुवातीला त्यांनी ७ कोटींचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले होते. हा जमा होणारा निधी भारताच्या कोरोना (Corona) लढ्यासाठी दान करण्यात येणार आहे.  भारताचा कर्णधार आणि बॉलिवूड अभिनेत्री यांनी केवळ मोहिमेसाठी दान करण्याचे आवाहन केले नाही, तर त्यांनी स्वतः २ कोटी दान केले. काल MPL Sports Foundation नं ५ कोटींची मदत जाहीर केल्यानंतर ७ कोटींचे लक्ष्य पार झाले आणि विराटने (Virat) पुन्हा ११ कोटींचे लक्ष्य समोर ठेवले आणि आज तेही पार केले. विराट व अनुष्काने (Virat-Anushka) या मोहिमेतून ११ कोटी ३९ लाख ११, ८२० जमा केले आहेत.

जिवंतपणी उपचार नाही आणि मृत्यूनंतरही अवहेलनाच, पवारांची योगींवर टीका

सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून राहुल गांधी यांची मोदींवर टीका

विराट कोहली (Virat Kohli) म्हणाला, एकदा नव्हे तर दोनदा आम्ही लक्ष्य पार केले. ही आनंदाची बातमी करताना मन भरून आलेय आणि भावना मांडण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. ज्यांनी ज्यांनी या मोहिमेत हातभार लावला त्या सर्वांचे आभार. आपण सर्व एकत्र येऊन हा लढा जिंकूयात.

Anushka Sharma-Virat Kohli raise Rs 11 cr for Covid-19 relief, Priyanka Chopra’s fundraiser collects $1 million

अनुष्का (Anushka) म्हणाली, आपण सर्वांना दाखवलेल्या एकजुटता पाहून मी थक्क झाली. आम्ही ठरवलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक रक्कम जमा केल्याचे सांगताना अत्यानंद होत आहे आणि याने अनेकांचे जीव वाचवले जाऊ शकतात. सर्वांचे मनापासून आभार.

विराट कोहलीचा (Virat Kohli) आयपीएलमधील संघ रॉयल चॅलेंजर्स बँगलोर हेही कोरोना लढ्यासाठी काम करत आहेत. चेन्नई सुपर किंग्सने तामीळनाडू सरकारला 450 ऑक्सिजन संच दिले, सनरायझर्स हैदराबादने 30 कोटी, तर राजस्थान रॉयल्सने 7.5 कोटींची मदत केली. शिवाय पॅट कमिन्स, ब्रेट ली, सचिन तेंडुलकर, अजिंक्य रहाणे, शेल्डन जॅक्सन, शिखर धवन आदी खेळाडूंनीही हातभार लावला आहे. यापूर्वी विराट आणि अनुष्का (Virat-Anushka) यांनी आर्थिक मदत केली होती. पण त्यांनी रक्कम जाहीर केली नव्हती, परंतु सुत्रांच्या माहितीनुसार त्यांनी ३ कोटी दान केल्याचे समजले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी