29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसंजय राऊतांचा मोदींना खास सल्ला, दिलं महाराष्ट्र मॉडेलचं उदाहरण...

संजय राऊतांचा मोदींना खास सल्ला, दिलं महाराष्ट्र मॉडेलचं उदाहरण…

टीम लय भारी

मुंबई :-   देशात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहे. या परिस्थितीवरून संजय राऊत यांनी मोदींना खास सल्ला दिला आहे (Sanjay Raut has given special advice to Modi).

देशात गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ६२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले व ४१२० जणांचा मृत्यू झाला. बुधवारची आकडेवारी लक्षात घेता नव्या रुग्णांच्या संख्येत गुरुवारी १४ हजारांनी वाढ झाली व मृतांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात ३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ३७ लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील १ कोटी ९७ लाख जण आजवर कोरोनामुक्त झाले.

विराट-अनुष्का यांनी कोरोना लढ्यासाठी जमा केला रेकॉर्डतोड निधी; पाहा काय केलं पुढे…

जिवंतपणी उपचार नाही आणि मृत्यूनंतरही अवहेलनाच, पवारांची योगींवर टीका

देशभरातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती दिसून येत आहे. अनेकांनी यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर आफला राग व्यक्त केला आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमधील अनेक दोषांसाठी सरकारची धोरणे जबाबदार असल्याचे सांगत सोशल नेटवर्किंगवरुन सरकावर निशाणा साधला जात आहे. याचदरम्यान, शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे (Shiv Sena leader Sanjay Raut has criticized the Modi government).

संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, देशात पंतप्रधान आहेत. केंद्रीय गृहमंत्री आहेत. पण ते गायब आहेत. त्यामुळे देश रामभरोसे चालला आहे. गंगा-यमुना नदीत प्रेत सापडत आहेत. नद्यांमध्ये प्रेतांचा खच दिसून येत आहे. मृतदेहांवर व्यवस्थित अंत्यसंस्कार ही करता येत नाही. या पूर्वी या देशात असे कधीच झाले नव्हते. देशात नुसता हाहाकार माजला आहे. प्रभू श्रीरामाच्या अयोध्येत ऑक्सिजन अभावी लोक मरत आहेत. अहंकार आणि राजकारण विसरून जर बोलणी केली तर देश पुढे जाईल, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.

What’s the need for Central Vista amid pandemic? asks Sena’s Sanjay Raut

संजय राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात नेहमीच उत्तम काम झाले आहे. त्यांना बदनाम करण्याचे काम ही नेहमीच झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली देशात महाराष्ट्राने उत्तम काम केले आहे. तसेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे काम महाराष्ट्राने उत्तम प्रकारे केले आहे. त्याचे कौतुक देशात नव्हे तर जगभरात सुरू आहे, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्याचप्रमाणे केंद्र सरकार, पंतप्रधान आणि देशाच्या आरोग्य मंत्र्यांनी कोणताही अहंकार न बाळगता महाराष्ट्र मॉडेल देशात लागू करायला हवे, असे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितले.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे लिअध्यक्ष एम. के. स्टॅन अशा देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्तपणे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राजधानी दिल्लीमधील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प, नागरिकांसाठी मोफत लसीकरण, केंद्र सरकारने पारित केलेले ३ कृषी कायदे अशा एकूण ९ मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीतील सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तातडीने थांबवण्यात यावा आणि त्यासाठी देण्यात आलेला निधी ऑक्सिजन आणि लसींचा साठा मिळवण्यासाठी वापरावा, अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी