31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeराजकीयसेंट्रल विस्टा प्रकल्पावरून राहुल गांधी यांची मोदींवर टीका

सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून राहुल गांधी यांची मोदींवर टीका

टीम लय भारी

मुंबई :-  कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणा वाढत आहे. या परिस्थितीत आरोग्य व्यवस्था खिळखिळी झाली आहे. ऑक्सिजन आणि लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी कोरोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदीवर टीका केली आहे (Rahul Gandhi criticizes Modi over corona vaccine shortage and Central Vista project).

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे आरोग्य सुविधांवर ताण येऊन त्या अपुऱ्या पडत असल्याचे चित्र सध्या देशभरात आहे. ऑक्सिजन आणि बेड्सची कमी असल्याचे काही दिवसापूर्वी पहायला मिळत होते. कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरणाचा पर्याय सध्या समोर आहे. अशातच देशात मोठ्या प्रमाणावर लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. केंद्राकडून लस पुरवठा होत नसल्याचा आरोप अनेक राज्यांनी केला आहे.

तुमचा राजकीय पक्ष मेलेल्या व्यक्तीला परत आणणार नाही, इरफान पठाणने कंगनाला झापलं

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून शिवसेनेचा केंद्र सरकारला सवाल

लसीच्या कमतरतेमुळे अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण बंद करण्याचा निर्णय घेतल आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या सर्वांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी कोरोनावरील लसींचा तुटवडा आणि सेंट्रल विस्टा प्रकल्पावरून पंतप्रधान मोदींना टीकेचे लक्ष्य केले आहे (Rahul Gandhi criticizes Modi over corona vaccine shortage and Central Vista project).

लस आणि ऑक्सिजन सोबत पंतप्रधान मोदी सुद्धा देशातून गायब आहेत असे ट्विट राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केले आहे. “लस, ऑक्सिजन आणि औषधांसोबत पंतप्रधान सुद्धा गायब आहेत. उरले आहे तर फक्त सेंट्रल विस्टा, औषधांवर जीएसटी आणि जिथे तिथे पंतप्रधानांचे फोटो”, असे आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Covid-19: ‘Modi missing along with vaccines, oxygen and medicines,’ says Rahul Gandhi

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अन्य पक्षांनी देखील सेंट्रल विस्टा प्रकल्पावर खर्च करण्यात येणारा पैसा हा आरोग्य व्यवस्थेसाठी वापरण्याचा सल्ला दिला होता. तसेच कोरोनावरील औषधांवर जीएसटी कर न लावण्याची देखील मागणी विरोधकांतर्फे करण्यात आली होती. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोरोना औषधे, लसी आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी उपकरणांचा देशांतर्गत पुरवठा तसेच व्यावसायिक आयातीवरील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) पूर्णत: माफ केल्यास त्या वस्तूंच्या किमती कमी होण्याऐवजी वाढतील असे सांगितले होते.

याआधी देखील काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी देशातील वाढत्या कोरोना संक्रमणावरुन आणि लसीकरणावरुन बुधवारी केंद्र सरकारवर टीका केली होती. घरोघरी जाऊन लसीकरण केल्याशिवाय कोरोनासोबत लढणे अशक्य असल्यांच त्यांनी म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी