जगातील सर्वात मोठा सायबर दरोडा प्रकरण आरोपीना 4 वर्षांची शिक्षा

जगातील सर्वात मोठा सायबर दरोडा प्रकरण
आरोपीना 4 वर्षांची शिक्षा
World’s biggest cyber robbery case
Accused sentenced to 4 years.

कॉसमॉस कॉ ऑप बँकेत सर्वात मोठा सायबर दरोडा पडला होता.बँकेच्या ए टी एम कार्ड सिस्टम सुमारे 94 कोटी रुपये चोरण्यात आले होते.याबाबतव कोर्टाने निकाल दिला आहे.या खटल्यातील 11 आरोपीना 4 वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली आहे.

कॉसमॉस कॉ ऑप बँक लिमिटेड ही एक को ऑप मधील मोठी बँक आहे.बँकेच्या राज्यभर शाखा आहेत.तर बँकेच मुख्यालय पुणे येथे आहे.बँकेत 2018 सालात मोठी घटना घडली होती. दोन मोठी क्रेडिट कार्ड आहेत. एक विजा कार्डम आणि दुसरं रुपे कार्ड . या कार्डचा डेटा आरोपीनी चोरला होता.आणि त्याद्वारे बँकेची स्विफ्ट सिस्टम हॅक करून , एटीएमचा स्विच सर्व्हर डाऊन करून सुमारे 78 कोटी रुपये वेगवेगळ्या 28 देशातील खात्यावर वळते करण्यात आले होते.तर दोन कोटी 50 लाख रुपये भारतातील खात्यात वळते करण्यात आले होते. एका रात्रीत हा सायबर दरोडा पडला होता.

या प्रकरणी पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.पोलिसांनी 11 आरोपीना अटक केली होती.
भिवंडी येथून फाईम शेख आणि मोहमद सईद याला अटक करण्यात आली होती.फाईम खान , मो जावेद जब्बार याला संभाजी नगर येथून तर दार महेश राठोड याला नांदेड येथून नरेश महाराणा याला पालघर येथून तर अनथोनी , बशीर खान
, फिरोज खान यांना मुंबईतून अटक करण्यात आली होती. त्याच प्रमाणे अब्दुल शेख आणि सलमान बेग यांना ठाणे येथून अटक करण्यात आली होती.या आरोपीवर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यांच्यावर गेल्या चार वर्षा पासून खटला सुरू होता.आज त्याचा निकाल देण्यात आला.यावेळी सर्व आरोपीना चार वर्षे आणि 7 महिने सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून वृद्धाची 8 लाखाची फसवणूक

2024ची निवडणूक मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

खेल खतम, पैसा हजम: ट्विटरकडून अमिताभ बच्चन यांची फसवणूक?

 

आरोपीनी एकदा नाही तर दोनदा सायबर दरोडा टाकला होता. पहिला दरोडा 11 ऑगस्ट 2018 रोजी आणि दुसरा दरोडा 13 ऑगस्ट 2018 रोजी टाकला होता. दोन्ही दरोड्यात मिळून 94 कोटी रुपये चोरण्यात आले होते. या दरोड्याने सर्वच क्षेत्रात खळबळ माजली होती.हा प्रकार झालाच कसा,अस प्रत्येक जण एकमेकांना विचारत होते. कॉसमॉस बँकेचे अधिकारी तर हबकले होते.या घटनेचा तपास देश पातळीवर सुरू होता.अखेर पुणे पोलिसांनी आरोपीना गाठलच. बराच मुद्देमाल जप्त केला होता. यामुळे बँकेला दिलासा मिळाला होता.

 

सुधाकर काश्यप

Recent Posts

पाच वर्षांत सर्व भ्रष्टाचाऱ्यांवर कडक कारवाई होणार! झारखंडमधील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही…

5 hours ago

जेडीएस नेते एचडी रेवन्ना यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, प्रज्वल रेवन्ना फरार

अपहरणाचा आरोप झाल्यानंतर जेडीएस नेते एचडी रेवन्ना ( HD Revanna ) यांना पोलिसांनी ताब्यात (…

5 hours ago

देशात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज- माजी आमदार वसंत गिते

गेली दहा वर्षे जनतेला भूलथापा देणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी इंडिया आघाडीला(India aghadi)…

6 hours ago

लोकसभा निवडणुकीत गद्दारांना चांगला धडा शिकवा- सुधाकर बडगुजर

गद्दारांना धडा शिकविण्याची (Teach traitors a good lesson) आयतीच संधी लोकसभा निवडणुकांमुळे चालून आली आहे.ही…

6 hours ago

भुजबळ साहेबांच्या सुचनेने महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणणार –अंबादास खैरे

नाशिक लोकसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाला उमेदवारी सोडल्यानंतर महायुतीच्या (Mahayuti) उमेदवाराला मंत्री छगन भुजबळांच्या सुचनेने…

6 hours ago

नाचणी खायचे फायदे

चांगल्या आरोग्यासाठी भाजी आणि फळांचे सेवन ज्याप्रमाणे गरजेचे आहे(Benefits of eating ragi). त्याचप्रमाणे आपल्या पोटामध्ये…

8 hours ago