30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीय2024ची निवडणूक मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

2024ची निवडणूक मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

राज्यात अगदी वर्षभरावर आलेली लोकसभेची निवडणूक आणि दीड वर्षावर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान केलं आहे. एकत्र लढण्याची फक्त इच्छा पुरेशी नसते. असं वक्तव्य पवार यांनी केलं आहे. मात्र आता शरद पवार यांनी केलेल्या एका विधानामुळे पुढील निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या पुढील निवडणुकांमध्ये एकत्र लढण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाविरोधात राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातावरणनिर्मिती करत आहे. तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढण्याबाबत वारंवार भाष्य करत आहेत. एकीकडे संजय राऊत हे 2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रच लढणार, असं संजय राऊत हे वारंवार सांगत आहेत. मात्र शरद पवार यांनी केलेल्या या विधानामुळे एकत्र लढण्याबाबत महाविकास आघाडीमध्ये संभ्रम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आता शरद पवार यांनी केलेल्या विधानाबाबत काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

काय म्हणाले शरद पवार?
2024 च्या निवडणुका मविआ एकत्र लढेल का? तसेच वंचित बहुजन आघाडीसोबत येईल का? असा सवाल पवार यांनी उपस्थित करण्यात आला. ”वंचित आघाडीसोबत चर्चा झालेली नाही. जी चर्चा झाली ती फक्त कर्नाटकातल्या मर्यादित जागांविषयी. दुसरी कसलीही नाही. असं सांगत स्पष्टीकरण दिलं. तसेच, आम्ही एकत्र लढणार वगैरे आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण इच्छा पुरेशी नसते. जागांच वाटप, त्यामध्ये काही इश्यू. हे अजून केलंच नाही. तर कसं सांगता येईल. मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? असं मोठं विधान पवार यांनी केलं आहे.”

हे सुद्धा वाचा:

कोणी पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर..; शरद पवारांचा अप्रत्यक्ष इशारा

शरद पवारांची घणाघाती टीका; गुजरात दंगलीतील आरोपींना निर्दोष सोडणे ही संविधानाची हत्या

आताही मुख्यमंत्री पदावर बसण्याची इच्छा- अजित पवार

Sharad Pawar, Ajit Pawar, NCP,  Sharad Pawar’s confusion over holding MVA 2024 elections together

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी