33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमनोरंजनखेल खतम, पैसा हजम: ट्विटरकडून अमिताभ बच्चन यांची फसवणूक?

खेल खतम, पैसा हजम: ट्विटरकडून अमिताभ बच्चन यांची फसवणूक?

जगप्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर अधिग्रहीत केल्यावर एलॉन मस्क अनेकदा चर्चेत आले. अमिताभ बच्चन आणि ट्विटर यांच्यातील वॉर अजूनही सुरुच आहे. बिग बी अमिताभ बच्चन ट्विटरवर प्रचंड अॅक्टिव्ह असतात. नुकतंच त्यांच्या अकाऊंटवरुन ब्लू टिक काढून घेतल्याने ते वैतागले होते. आपल्या खास अंदाजात ट्वीट करत त्यांनी ट्विटरसमोर ब्लू टिक परत द्या म्हणत हात जोडले. आता त्यांचं ब्लू टिक परत आलं आहे मात्र त्यासाठी त्यांना पैसे भरावे लागले. आता एक वेगळीच माहिती उघड झाल्याने ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांनी बिग बींची फसवणूक केल्याचंच उघड झालंय.

एलॉन मस्क याने ट्विटरसाठी एप्रिलपासून एक नियम सुरु केला. ब्लू टिक कोणालाही मोफत मिळणार नाही तर त्यासाठी दरमहा 650 रुपये मोजावे लागतील. मात्र आता असा नियम समोर आला की ज्यांचे 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत त्यांना पैसे भरावे लागणार नाहीत. हे समजल्यावर अमिताभ बच्चन यांनी ट्वीट करत जाब विचारला आहे.

ते लिहितात, ‘ए ट्विटर मावशी, काकी, ताई, आत्या…झोळी भरुन नावं आहेत तुझे! पैसे तर घेतले माझ्याकडून अन् आता सांगते की 1 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स असतील तर ब्लू टिक मोफत मिळेल. माझे तर 48.4 मिलियन फॉलोअर्स आहेत, मग ?? पैसे मिळाले, खेळ संपला??’ अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘आता तुम्हाला पैसे परत मिळणार नाहीत, मस्क यांनी तुम्हाला फसवलं’ अशा कमेंट्स युझर्सने केल्या आहेत.

ट्विटर खरेदी करण्यासाठी मस्कने प्रचंड पैसा खर्च केला आहे. ती रक्कम परत मिळवण्यासाठी त्यांचा हा धाडसी प्रयत्न सुरू आहे, असे खूप जणांचे म्हणणे आहे. बऱ्याच काळापासून ट्विटर नफ्यात नाहीये. त्यामुळेच नवा निर्णय घेऊन त्यांनी पैसा वसूल करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. ज्यांना कुणाला ब्ल्यू टिक हवी आहे किंवा आपली ब्ल्यू टिक सर्व्हिस कायम ठेवायची आहे त्यांना आता ट्विटर ब्ल्यूचं सब्सक्रिप्शन घ्यावं लागणार आहे. भारतात ट्विटर ब्ल्यूचे सब्सक्रिप्शन 650 रुपयांपासून सुरू होतं. मोबाईल यूजर्ससाटी दर महिन्याला 900 रुपये भरावे लागणार आहेत. ट्विटरने भारतासहीत या आधीच अमेरिका, युके, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पेड सर्व्हिस सुरू केली आहे. या देशांमधील नागरिकांनी ट्विटरची पेड सर्व्हिस घेण्यासाठी मोठी रक्कमही मोजली आहे.

हे सुद्धा वाचा:

एलॉन मस्कचा धंदा म्हणजे धंदा; पैसे न भरल्याने अमित शाह,अमिताभ, सलमान, विराट ब्ल्यू टिकविना

ट्विटरची नवी चिमणी पाहिलीत का?

AI इंटेलिजेंसमुळे नोकरी गमावणारा टॉम पहिला..; IAS सुप्रिया साहू यांचे वास्तववादी ट्विट

Amitabh Bachchan, Twitter, War between Amitabh Bachchan and Twitter, Elon Musk

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी