29 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeक्राईमसेक्सटॉर्शनच्या माध्यमातून वृद्धाची 8 लाखाची फसवणूक

सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून वृद्धाची 8 लाखाची फसवणूक

सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून एका वृद्धाची 8 लाख रुपयांना फसवणूक करण्यात आली आहे.बळीत वृद्ध हे वाकोला येथे राहतात.या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

फसवणूक झालेली व्यक्ती वाकोला,सांताक्रूझ येथे राहते. त्यांचा व्यवसाय आहे.एके दिवशी त्यांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला.यात ती महिला नग्न होती.व्यापाऱ्याने तिच्याशी काही मिनटं बोलणं केलं.आणि अचानक कॉल कट झाला.यानंतर दुसऱ्या एका नंबर वरून व्यापाऱ्याला फोन आला.तुम्ही ज्या महिलेशी नग्न चाट करत होतात,त्या महिलेने आत्महत्या केली आहे.तुमचं नाव यात यायचं नसेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील.वृद्ध व्यापाऱ्याने घाबरून 15 नोव्हेंबर 22 रोजी ऐशी हजार रुपये ट्रान्सफर केले.

यानंतर ही त्यांना सतत फोन यायचे आणि पैशाची मागणी केली जायची.फोन करणारा व्यक्ती आपलं नाव विक्रम असून आपण पोलीस असल्याचं सांगायचा.तो जेव्हा फोन करायचा तेव्हा त्याचा डीपी पोलीस युनिफॉर्म मधील फोटो असायचा. यामुळे वृद्ध व्यापारी आणखीन घाबरायचा. व्यापाऱ्याने डिसेंबर 2022 मध्ये एकदा 2 लाख तर एकदा 20 हजार रक्कम त्या ब्लॅकमेल करणाऱ्याला ट्रान्सफर केली.त्या नंतर सुमारे सहा वेळा एकूण 5 लाख 20 हजार इतकी रक्कम ट्रान्सफर केली.विक्रम याची पैशाची मागणी वाढतच होती.

 हे देखिल वाचा 

2024ची निवडणूक मविआ एकत्र लढण्याबाबत आत्ताच कसं सांगू? शरद पवारांच्या वक्तव्याने खळबळ

खेल खतम, पैसा हजम: ट्विटरकडून अमिताभ बच्चन यांची फसवणूक?

साने गुरुजींची कर्मभूमी अंमळनेरमध्ये होणार ९७ वे मराठी साहित्य संमेलन

 

अखेर कंटाळून व्यापाऱ्याने सर्व हकिकत त्यांच्या जावयाला सांगितली. यानंतर त्यांनी वाकोला पोलीस स्टेशन येथे जाऊन गुन्हा दाखल केला.याचा तपास सायबर विभागाचे अधिकारी करत आहेत.तपासात विक्रम हा पोलीस नसल्याचं उघडकीस आलं आहे. आता पोलीस विक्रम आणि त्या नग्न चाट करणाऱ्या महिलेचा शोध घेत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी