31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयमहाविकास आघाडीसह 14 पक्षांची दिल्लीत बैठक; 'या' प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरणार

महाविकास आघाडीसह 14 पक्षांची दिल्लीत बैठक; ‘या’ प्रकरणावरून केंद्र सरकारला घेरणार

टीम लय भारी

नवी दिल्ली:- दिल्लीत बुधवार (ता.28) केंद्र सरकार आणि पेगसाप्रकरणी विरोधात विरोधी पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीला महाविकास आघाडीसह तब्बल 14 पक्षांचे नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच विरोधकांच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने शिवसेना यूपीएचा एक भाग झाल्याचे बोलले जात आहे (Mahavikas Aghadi and 14 parties meeting in Delhi).

पेगासस प्रकरणावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना संसदेत चांगलेच घेरले आहे. या प्रकरणावर संसदेत चर्चा झाली पाहिजे, अशी विरोधकांची मागणी आहे. मात्र, त्यांची ही मागणी सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावल्याने पुढची रणनीती ठरवण्यासाठी आज विरोधकांची बैठक पार पडली.

देवेंद्र फडणवीस, रोहित पवार एकाच तालुक्याच्या दौऱ्यावर

महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा

दिल्लीत झालेल्या या बैठकीला काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेना नेते संजय राऊत, खासदार सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकारला यावर उत्तर द्यावच लागेल, असा इशारा दिला (Rahul Gandhi will not compromise on the Pegasus issue).

Mahavikas Aghadi and 14 parties meeting in Delhi
एकाच मंचावर बड्या नेत्यांची बैठक

सरकारला नोटीस देणार

या बैठकीत पेगासस प्रकरणावर संसदेत चर्चा घडवून आणण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी सरकारला 10 दिवसांची नोटीस देण्यात येणार आहे. त्यावर राहुल गांधी यांची सही असेल. विरोधकांमध्ये आतापर्यंत एकमत नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, पेगासस मुद्द्यावरून विरोधक पुन्हा एकदा एकत्रित आल्याचे दिसून येत आहे (Mahavikas Aghadi and other parties have come together against Pegasus).

पूरग्रस्त भागात राजकीय दौरे नको; शरद पवार

14 parties attend Opposition meet to corner Centre, AAP also joins in

भारतात चौकशी का होत नाही?

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनीही संसदेत पेगाससवर चर्चा व्हावी, अशी मागणी केली आहे. पेगासस प्रकरणाची अनेक देशात चौकशी होत आहे. मग भारतात का होत नाही? असा सवाल करतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या प्रकरणाची चौकशी केली पाहिजे, असे खरगे म्हणाले.

 गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे

पेगासस प्रकरणावरून विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. हे प्रकरण विरोधकांनी संसदेत लावून धरले आहे. त्यामुळे संसदेच्या कामकाजात अडथळे येत आहेत. विरोधक सत्ताधाऱ्यांकडे या प्रकरणाचे उत्तर मागत आहे. दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मुद्द्यावर उत्तर दिले होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्र्यांनीच त्यावर उत्तर द्यावे, या मागणीवर विरोधक अडून बसले आहेत (Mahavikas Aghadi and other parties called for the beleagured PM to resign).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी