31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमंत्रालयमंत्रालयातील मलईदार पदांवर अधिकाऱ्यांचे बस्तान, दोन वर्षांपासून बदल्यांना मुहूर्तच नाही

मंत्रालयातील मलईदार पदांवर अधिकाऱ्यांचे बस्तान, दोन वर्षांपासून बदल्यांना मुहूर्तच नाही

टीम लय भारी

मुंबई : राज्यभरातील विविध खात्यांमधील क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. पण मंत्रालयीन अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र सलग दुसऱ्या वर्षी टाळल्या आहेत (Mantralaya’s  officers transfers hold from 2 years ). या बदल्यांना कधी मुहूर्त मिळणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहेत.

मंत्रालयामध्ये सहसचिव, उपसचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी व सहायक या दर्जाचे अधिकारी मोठ्या संख्येने आहेत. तीन वर्षाच्या मर्यादेत या अधिकाऱ्यांच्याही बदल्या करणे बंधनकारक आहे (Mantrlaya’s officers should transferred in 3 years).

गेल्या वर्षी ‘कोरोना’च्या कारणास्तव मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्या न करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता ( Mahavikas Aghadi government holds Mantralaya officers transfers due to Corona pandemic ). यंदाही तोच निर्णय कायम ठेवला आहे.

हे सु्द्धा वाचा

मंत्रालयात भरलाय बदल्यांचा बाजार

मंत्रालय कॅन्टीनमधील जेवणात सापडले झुरळ

IAS प्राजक्ता लवंगारे यांची बदली, उद्धव ठाकरे यांनी दिले मानाचे पद

तीसरे मोर्चे की तैयारी नहीं:शरद पवार के घर हुई मीटिंग का एजेंडा थर्ड फ्रंट नहीं; राकांपा नेता ने कहा- मीटिंग उन्होंने नहीं बुलाई

दुसऱ्या बाजूला राज्यभरातील अधिकाऱ्यांच्या बदल्या मात्र घाऊक पद्धतीने केल्या जात आहेत ( Mahavikas Aghadi Goverement transferred field officers ). असे असताना मंत्रालयातील अधिकाऱ्यांना झुकते माफ दिले जात असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

क्षेत्रीय स्तरावरील अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्याला एका ठिकाणाहून दुसरीकडे जावे लागते. या उलट मंत्रालयातील अधिकाऱ्याची बदली झाली तर त्याचा केवळ मजला बदलतो.

सलग दोन वर्षे बदल्या न झाल्यामुळे अनेकजणांना मलईदार पदांचा यथेच्छ उपभोग घेता येत आहे. अगदी 8 ते 10 वर्षापासून अनेकजण एकाच पदावर बस्तान मारून बसले आहेत ( Many officers hold post from 8 to 10 years at Mantralaya ).

मलईदार पदांवर अनेक वर्षांपासून बस्तान मारलेल्या अशा अधिकाऱ्यांनीच वरिष्ठ अधिकाऱ्यांची गळी ‘कोरोना’चे कारण उतरवले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या नाहीत.

क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. मग मंत्रालयातील हे अधिकारी सरकारचे जावई आहेत का, असाही सवाल सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना केला.

आमचा ‘यू ट्यूब चॅनेल’ सबस्क्राईब करा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी