31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeराजकीयनितेश राणेंना जामीन नाकारल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचे ट्वीट, म्हणाले…

नितेश राणेंना जामीन नाकारल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचे ट्वीट, म्हणाले…

टीम लय भारी

मुंबई: भाजपा आमदार नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानेही फेटाळला आहे. सुप्रीम कोर्टाने नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयात शरण होण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र सोबतच त्या १० दिवसांमध्ये नितेश राणेंना अटक केली जाऊ नये असे निर्देश देत दिलासा दिला आहे.( Milind Narvekar’s tweet after denying bail to Nitesh Rane)

दरम्यान शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी उपहासात्मक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी ‘लघु सुक्ष्म दिलासा!’ असं म्हणत अप्रत्यक्षपणे नितेश राणेंना टोला लगावला आहे.

हे सुद्धा वाचा

राणे कुटुंबाला आता तरी याची जाणीव होईल,शिवसेनेचा टोला

भाजपाने उगाच इतिहासाची ठेकेदारी घेऊन इथे गडबड करु नये, संजय राऊतांचा इशारा

सर्वोच्च न्यायालयाचा नितेश राणेंना दणका

‘India would have had a Shiv Sena PM if…’: Sanjay Raut hits out at BJP

सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्लाप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालय आणि हायकोर्टाने जामीन नाकारल्यानंतर त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. पण तिथेही त्यांना दिलासा मिळालेला नाही.

शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी एबीपी माझाशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली आहे. “या सगळ्या न्यायिक प्रक्रिया आहेत. कायदा सर्वांसाठी समान असतो. कोणाचाही उन्माद कायदा खपवून घेत नाही. कायद्यापुढे सर्वांना झुकावं लागतं. असा मस्तवालपणा, गुंडगिरी, दादागिरी, लोकांना धमकावणं हे सगळे प्रकार….आता पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीत”.

लोकप्रतिनिधी, कोणीही असो कायद्यासमोर सर्व समान असतात. याची जाणीव आता तरी राणे कुटुंबाला होईल असं वाटतं. याच्यातून बोध घेतला पाहिजे. आता तरी कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची काळजी घेतली पाहिजे, शेवटी लोक आपला नेता सभागृहात आणि सभागृहाबाहेर कसा वागतो हे पाहत असतात. आता जनता पूर्वीसराखी राहिली नाही. ते पाहत असतात,” असं मनिषा कायंदे यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी