31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूज...तर शेतक-यांचे आंदोलन चिघळणार : राजू शेट्टी

…तर शेतक-यांचे आंदोलन चिघळणार : राजू शेट्टी

टीम लय भारी

मुंबई  : केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणाने पुढे आल्याशिवाय तोडगा निघणार नाही. पण राज्य सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेतली तर आंदोलन तीव्र झाल्याशिवाय राहणार नाही, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

दुध भुकटी आणि बटरचा प्रश्न आहे ज्यामुळे भाव पडले आहेत. त्याबाबत केंद्र सरकारशी बोलून निर्याती संदर्भात पाठपुरावा करावा, अशी चर्चा बैठकीत झाली. सबसिडी देऊन देशातील शिल्लक दुध भुकटी निर्यात करण्यात यावी, अशी चर्चा झाली.

मंत्री केदार यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही आणि दूध उत्पादकांना दिलासा मिळणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष चालूच राहील, असे शेट्टी यांनी सांगितले.

दोन दिवसात आंदोलनाची पुढील दिशा ठरवू : खोत

जो पर्यंत शेतक-याच्या खात्यात अनुदान जमा होणार नाही, दुध भुकटीच्या निर्यातीला अनुदान मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही. आंदोलनाची दिशा दोन दिवसात ठरवू, असे सदाभाऊ खोत यांनी बैठकीनंतर सांगितले.

या बैठकीत गाईच्या दुधाला सहा रुपये अनुदान देण्यात यावे. खासगी किंवा सरकारी दूध संघ असतील त्यांना दूध निर्यात केल्यानंतरच प्रतिलीटर २० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मंत्र्यांकडे केली. मंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले आहे, असेही खोत म्हणाले.

मंत्र्यांनी शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली…

शेतकरी हाच आमचा केंद्रबिंदू आहे. त्यांच्या फायद्याची चांगली योजना सरकार आणणार आहे, असे असे आश्वासन राज्याच्या धोरणाचा निर्णय मंत्रिमंडळ स्तरावर होतो. मंत्री स्तरावर होत नाही, असे सांगून पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी दूध उत्पादकांच्या तोंडाला पाने पुसली.

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत आंदोलन सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात राज्याचे पशु आणि दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला माजी कृषी राज्यमंत्री आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यासह इतर काही संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत महाविकास आघाडीचा केंद्रबिंदू शेतकरी आहे. दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका आहे, असे मत केदार यांनी व्यक्त केले. ही बैठक तोडगा काढण्यासाठी बोलवण्यात आली नव्हती. तर या बैठकीत संघटना आणि नेत्यांनी अनुदानासह दूध उत्पादनाच्या अडचणी मांडल्या, असे केदार म्हणाले.

कोरोना संकटामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. दूध उत्पादकांना मदत करण्याची आमची भूमिका आहे. गेल्या सरकारने ५ रुपये अनुदानाचा निर्णय घेतला. मात्र अनेकांना लाभच मिळाला नाही. हे टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु, असेही केदार यांनी सांगितले.

दूध भुकटीचा निर्णय आम्ही घेतला, ही मागणी कोणत्याही पक्षाने केली नव्हती, आम्ही स्वत:हून हा चांगला निर्णय घेतला. दूध भुकटीबाबत मी केंद्राशी संपर्क केला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले, अशीही माहिती केदार यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी