33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूजनरेंद्र मोदी अशुभ मुहूर्तावर करणार राम मंदिराचे भूमीपूजन !

नरेंद्र मोदी अशुभ मुहूर्तावर करणार राम मंदिराचे भूमीपूजन !

टीम लय भारी

वाराणसी : अयोध्येतील राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी ५ ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या दिवशी दुपारी सव्वा बारा वाजता भूमिपूजन करून मंदिर निर्माणाची आधारशिला ठेवणार आहेत ( Narendra Modi will inaugurate Ram Mandir foundation ). मात्र, अयोध्येत भूमिपूजनापूर्वीच या मुहुर्तावर वाद निर्माण झाला आहे.

नरेंद्र मोदी अशुभ मुहूर्तावर करणार राम मंदिराचे भूमीपूजन !
जाहिरात

काशीतील साधूसंतांबरोबरच ज्योतिषांनी देखील मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्न उपस्थित केला आहे. शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनीही आपल्या फेसबूक पेजवर एक पोस्ट करत, मंदिराच्या पायाभरणीसाठी अथवा भूमिपूजनासाठी निश्चित करण्यात आलेला ५ ऑगस्टचा मुहूर्त अशुभ असल्याचे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांकडून ‘रयत’वर आणखी एका IAS अधिकाऱ्याला संधी

देशात ‘अमर,अकबर, अँथनी’ एकत्र राहू नयेत असे भाजपाला वाटते : सत्यजीत तांबे

पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ ऑगस्टला दुपारी १२ वाजून १५ मिनिटांनी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन आणि पायाभरणी करतील ( Narendra Modi will present at Ram Mandir foundation stone ceremony ) . मात्र, मंदिराच्या भूमिपूजनाचा हा मुहूर्त त्या दिवशीचा सर्वात अशुभ मुहूर्त असल्याचे म्हटले जात आहे.

Mahavikas Aghadi

अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन काशीच्या विद्वानांच्या देखरेखीत पार पडेल. काशी विद्वत परिषदेचे तीन सदस्य या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यात प्रसिद्ध जोतिषी रामचन्द्र पांडेय, काशी विद्वत परिषदेचे संयोजक डॉ. रामनारायण द्विवेदी आणि काशी हिंदू विश्वविद्यापीठाचे ज्योतिष विभागातील प्राध्यापकांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या वादानंतर दोन विद्वान आता स्वत:ला कार्यक्रमापासून वेगळे करत आहेत. ते या प्रकरणावर बोलणे टाळत आहेत.

नरेंद्र मोदी अशुभ मुहूर्तावर करणार राम मंदिराचे भूमीपूजन !

काशी विद्वत परिषदेचे संयोजक डॉ. रामनारायण द्विवेदी म्हणाले, मंदिराच्या भूमिपूजनाचा मुहूर्त काशी विद्वत परिषदेने सांगितलेला नाही. मात्र, मुहूर्तावर उपस्थित करण्यात येणा-या प्रश्नांवर रामनारायण द्विवेदी म्हणाले, हे भूमिपूजन खुद्द प्रभू श्रीरामांचे आहे आणि पायाभरणी स्वत: देशाचा राजा करत आहेत. यामुळे मुहूर्ताचे फारसे महत्व नाही, अशी पळवाट त्यांनी काढली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी