30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमंत्रालयधनंजय मुंडे महिनाभरानंतर मंत्रालयात झाले रूजू

धनंजय मुंडे महिनाभरानंतर मंत्रालयात झाले रूजू

टीम लय भारी

बीड : ‘कोरोना’मुक्त झालेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा ‘कॉरन्टाईन’चाही कालावधी संपला आहे. त्यामुळे मुंडे यांनी आज मंत्रालयात उपस्थिती नोंदविली. यावेळी त्यांनी नियमित कामकाजाचा आढावा घेतला ( Dhananjay Munde started his work in Mantralaya ).

धनंजय मुंडे गेल्या महिन्यातच ‘कोरोना’मुक्त झाले होते. पण त्यानंतर काही दिवस ते ‘कॉरन्टाईन’ होते. त्यांचा ‘कॉरन्टाईन’चा कालावधी ५ जुलै रोजी संपला. त्यानंतर ते आता लगेचच कामाला लागल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mahavikas Aghadi

विशेष म्हणजे, कॉरन्टाईनच्या कालावधीतही त्यांनी आपल्या कामाचा धडाका सुरूच ठेवला होता. घरूनच ते ‘झूम’द्वारे मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपस्थित राहिले होते. त्याशिवाय त्यांनी सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन, समाजकल्याण आयुक्त प्रवीण दराडे, अपंग कल्याण आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्यासोबत वेगवेगळ्या ऑनलाईन बैठकाही घेतल्या होत्या ( Dhananjay Munde taken meeting with officers ).

‘कोरोना’मुळे राज्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे प्रत्येक खात्यातील ३३ टक्के खर्च कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक खात्याने ३३ टक्क्यांच्या मर्यादेत आपल्या योजनांचा सुधारित आराखडा सादर करण्याबाबत सरकारने सुचना केल्या आहेत.

याबाबत धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून आपल्या खात्याचा सुधारित अर्थसंकल्पीय आराखडा तयार केला आहे ( Dhananjay Munde prepared new budget plan for Social Justice department ).

बीड जिल्ह्यात ‘कोरोना’ नियंत्रित ठेवण्यासाठी मुंडे यांनी ‘कॉरन्टाईन’ असतानाही लक्ष दिले. ते नियमितपणे जिल्हाधिकारी व इतर प्रमुख अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. ‘कोरोना’ रूग्णांचा शोध घेणे व त्यांच्यावर उपचार करणे यासाठी त्यांनी सरकारी यंत्रणा सतत सतर्क ठेवली होती. त्यामुळे बीडमध्ये ‘कोरोना’ कमी रूग्ण आहेत, असे सूत्रांनी सांगितले  ( Dhanajay Munde hane done great work in Corona pandemic ).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी