28 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeमंत्रालयअनुप जलोटा मंत्र्यांच्या बंगल्यावर अवतरतात तेव्हा..

अनुप जलोटा मंत्र्यांच्या बंगल्यावर अवतरतात तेव्हा..

"ऐसी लागी लगन..मीरा हो गयी मगन..अच्युततम केशवम..कृष्ण दामोधरम...अशा एकाहून एक सरस आणि सुमधूर भजनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे भजनसम्राट अनुप जलोटा अचानक मंत्रीमहोदयांच्या बंगल्यावर अवतरताच तिथे मत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या अभ्यंगतांच्या माना त्यांच्या दिशेने वळतात.

“ऐसी लागी लगन..मीरा हो गयी मगन..अच्युततम केशवम..कृष्ण दामोधरम…अशा एकाहून एक सरस आणि सुमधूर भजनांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे भजनसम्राट अनुप जलोटा अचानक मंत्रीमहोदयांच्या बंगल्यावर अवतरताच तिथे मत्र्यांना भेटण्यासाठी आलेल्या अभ्यंगतांच्या माना त्यांच्या दिशेने वळतात. काही चाहते त्यांना भेटून “सेल्फी” काढतात. एवढ्या मोठया कलांवताला याची देही, याची डोळा बघून मनोमन सुखावतात.

हा प्रसंग आहे, मलबार हिल येथील “पर्णकुटी” या शासकीय बंगल्यावरचा ! वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक कार्यमंत्री पदाचाही कार्यभार असल्यामुळे त्यांच्याकडे चित्रपट व नाट्य क्षेत्रातील नामवंत मंडळी विविध शासकीय कामानिमित्त भेटायला येतात.

सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्री म्हणून कामाचा आवाका मोठा असल्याने मंत्रालयातील त्यांच्या केबिनमध्ये भेटणाऱ्यांची प्रचंड गर्दी असते. जनसामान्यांसोबतच सेलिब्रेटी देखील मुनगंटीवार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपली कामे करून घेतात.
महावीर जयंतीनिमित्त मंगळवारी मंत्रालय बंद असल्याने मुनगंटीवार यांनी त्यांच्या “पर्णकुटी” बंगल्यावर अभ्यंगतांना भेटीसाठी वेळ दिली होती. त्यामुळे दुपारपासूनच बंगल्यावर भेटणाऱ्यांची गर्दी झाली होती.

प्रतीक्षा हॉलमध्ये अनेक जण मुनगंटीवार यांना भेटण्यासाठी वाट बघत बसले होते. तितक्यात एक प्रसिद्ध चेहरा हॉलमध्ये प्रवेश करता झाला. एका क्षणात सगळ्यांच्या माना तिकडे वळल्या. ते दुसरे तिसरे कोणी नव्हे तर साक्षात भजनसम्राट अनुप जलोटा होते. त्यांना बघताच सगळ्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले. अरे हे तर अनुप जलोटा साहेब..! असे उद्गार त्यांच्या तोंडून आले. जलोटा यांनी आपल्या सुरेल गळ्यातून शेकडो भजने गायिली आहेत. आजही त्यांची सुमधुर भजने ऐकली तर श्रोते भक्तिरसात अक्षरशः न्हाऊन निघतात.

हे सुद्धा वाचा

सुधीर मुनगंटीवार यांचा चमत्कार, नदी सुधाराचे स्वप्न साकार !

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, ठाकरे शोलेतील ठाकूर आहेत का ?

बापरे ! एकदाच मिळाला ‘286‘ महिन्यांचा पगार

अनुप जलोटा यांना आज साक्षात डोळ्यापुढे बघून काहींच्या आंनदाला पारावर उरला नाही. अनुप जलोटा यांनी मंत्रीमहोदयांची भेट घेऊन त्यांच्या कामाविषयी चर्चा केली. काही वेळानंतर ते बाहेर पडताच बंगल्याच्या आवारात चाहत्यांनी त्यांना गराडा घातला. त्यातील काहींना अनुप जलोटा यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. मंत्र्यांच्या भेटीसाठी आलेल्या लोकांना अनुप जलोटा यांना जवळून बघण्याचा योग आल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी