27 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसुधीर मुनगंटीवारांचा सवाल, ठाकरे शोलेतील ठाकूर आहेत का ?

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, ठाकरे शोलेतील ठाकूर आहेत का ?

टीम लय भारी

मुंबई : बहुमत असेल तर ते सिद्ध करायला अडचण काय आहे. स्वतःजवळ दोन हात आहेत, तर ते वर करून दाखवायला हवेत. तुम्ही ‘शोले’ चित्रपटातील ठाकूर आहात का ? असा बोचरा सवाल भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ व सचिव राजेंद्र भागवत यांची आज भेट घेतली. उद्या विधाभवन परिसरात सुरक्षा व्यवस्था, तसेच सदनातील आसन व्यवस्था याबाबत त्यांनी चर्चा केली.

त्यानंतर मुनगंटीवार यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, उद्या बहुमत चाचणीसाठी येणाऱ्या आमदारांना काहीही अडचण येणार नाही, याची जबाबदारी राज्य सरकार, मुख्य सचिव, विधानसभा सचिव हे पार पाडतील. हा महाराष्ट्र आहे. आतंकी, गुंडा – गर्दी खपवून घेतली जाणार नाही. पोलीस यंत्रणा सद्सद्विवेकबुद्धीने निर्णय घेतील. काहीजण धमक्या देत आहेत. या धमक्यांना महाराष्ट्र घाबरणारा नाही.

राज्यपाल भाजपधार्जिणे वागत असल्याचा प्रश्नावर मुनगंटीवार यांनी ‘महाविकास आघाडी सरकार’वर तोंडसुख घेतले. एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या गोष्टींवर भाष्य केले आहे. त्यामुळे सरकार अल्पमतात आले आहे. त्यात राज्यपालांची चूक काय ? सतत राज्यपालांवर खापर फोडत आहात. तुम्ही काय केजरीवालांचे विद्यार्थी आहात काय ? असाही सवाल मुनगंटीवार यांनी केला.

हे सुद्धा वाचा :

जय श्रीराम, टाटा…बाय बाय.. सुधीर मुनगंटीवारांनी ‘महाविकास आघाडी’ला हिणवले

पुढील दीड महिना पर्यटकांसाठी ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची दारे राहणार बंद

‘बंडखोर आमदार मस्त, आनंदी अन् समाधानी’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी