31 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeजागतिकबापरे ! एकदाच मिळाला ‘286‘ महिन्यांचा पगार

बापरे ! एकदाच मिळाला ‘286‘ महिन्यांचा पगार

टीम लय भारी

चिली : एका कर्मचाऱ्याची चूक कंपनीला किती महागात पडू शकते. याचा प्रत्यय नुकताच एका कंपनीला आला आहे. चिली देशात ‘कंसोर्सियो इंडस्ट्रियल डे अलीमेंटोस‘ म्हणजेच सीआयएएल ही मोठी कंपनी आहे. या कंपनीचा पगार करणाऱ्या अकाउंटंटकडून एक मोठी चूक झाली. या चुकीमुळे कामगारांच्या खात्यात एकाच वेळी 286 महिन्यांचा पगार जमा झाला. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. कंपनीच्या संचालकांना बॅंक खाते तपासताना ही बाब लक्षात आली.

जगभरात सगळीकडेच ऑनलाईन पध्दतीने पैशांची देवाण घेवाण केली जाते. कोणतीही कंपनी ऑनलाईन पध्दतीने कर्मचाऱ्यांच्या खात्यात पगार जमा करते. गेल्या कित्येक वर्षांपासून हिच पगाराची पध्दत सुरु आहे. मात्र ऑनलाईनमध्ये एखादी मोठी चूक सुद्धा कंपनीला खड्ड्यात घालते.

दरम्यान, या प्रकारामुळे कंपनीचे 16.54 करोड रुपयांचे कंपनीचे नुकसान झाले आहे. सुरुवातील बॅंकेत जावून दोन वेळा त्या कर्मचाऱ्याने पैसे परत करण्याचा वादा केला. पंरतु नंतर तो कर्मचारी पळून गेला. ही घटना मे महिन्यातील पगार देतांना घडली होती. आता 2 जूनला त्या कर्मचाऱ्याने कंपनीमध्ये राजीनामा पत्र सादर केले. त्यानंतर तो गायब झाला आहे. कंपनीच्या संचालकांनी त्या कर्मचाऱ्याविरोधात कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले आहे.

हे सुध्दा वाचा:

‘ठाकरे सरकार म्हणजे, नळाच्या तोट्या घेऊन जाणारा भाडेकरू’

Exclusive : भाजप नेत्याकडून घरचा आहेर, देवेंद्र फडणविसांनी शपथ घेताच शिंदे गटाचे आमदार ईडीच्या कारवाईतून मुक्त होतील

सुधीर मुनगंटीवारांचा सवाल, ठाकरे शोलेतील ठाकूर आहेत का ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी