32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमंत्रालयSolapur covid-19 deaths : मुख्य सचिवांनी सोलापूर जिल्हाधिकारी, आयुक्तांची खरडपट्टी काढली, सोलापूरमध्ये...

Solapur covid-19 deaths : मुख्य सचिवांनी सोलापूर जिल्हाधिकारी, आयुक्तांची खरडपट्टी काढली, सोलापूरमध्ये ‘कोरोना’चा देशातील सर्वाधिक मृत्यूदर

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’ची परिस्थिती हाताळण्यामध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी अक्षम्य निष्काळजीपणा दाखविला आहे. त्यामुळे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची खरडपट्टी काढली ( Chief Secretary Ajoy Mehta fired to Collector and Commissioner for negligence Solapur Covid-19 deaths ).  

एवढेच नव्हे तर, मुख्य सचिवांनी दीपक तावरे यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यांच्या ठिकाणी नवे आयुक्त म्हणून पी. शिवशंकर यांची नियुक्ती केली आहे.

Mahavikas Aghadi

सोलापूरमध्ये 800 पेक्षा जास्त ‘कोरोना’ रूग्ण आहेत, तर 78 जण मृत्यू पावले आहेत. सोलापूरमधील मृत्यूचा दर तब्बल 11.9 टक्के एवढा आहे. मुंबईतही ‘कोरोना’ग्रस्तांच्या मृत्यूचा दर अवघा 3.1 टक्के आहे. सोलापूरमध्ये भारतातील सर्वाधिक मृत्यूदर आहे ( Highest covid-19 deaths rate in Solapur) . जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व आयुक्त दीपक तावरे यांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार वाढल्याचे मुख्य सचिवांच्या लक्षात आले. त्यामुळे मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सध्येच जिल्हाधिकारी व आयुक्तांची खरडपट्टी काढली.

विशेष म्हणजे, या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा होते. ठाकरे यांच्यासमोरच मुख्य सचिवांनी शंभरकर व तावरे यांची खरडपट्टी काढली ( CS Ajoy Mehta fired to Milind Shambharkar and Deepak Taware on front of Chief Minister Uddhav Thackeray ).

हे सुद्धा वाचा

मंत्रालयातील IAS अधिकारी टेबल साफ करतात, चहाचे कपही धुतात

IAS मनिषा म्हैसकरांच्या घरी दोन चिमुकल्या मुली, तरीही अधिकारी म्हणून ‘कोरोना’च्या लढाईत आघाडी

माजी IAS अधिकाऱ्याने आईच्या पुण्यतिथीच्या खर्चाची रक्कम दिली CM फंडाला

Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा निरोप आला, अन् IAS शेखर चन्ने यांनी अडचणीत असलेल्या 9 जणांना घरी पोचविले

दोन दिवसांपूर्वी या व्हिडीओ कॉन्फरन्सचे आयोजन केले होते. ‘कोरोना’ रोखण्यासाठी तुम्ही काय केले याची माहिती मुख्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारली. पण जिल्हाधिकाऱ्यांना ही माहिती सांगताच आली नाही. जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त जबाबदारी एकमेकांकडे टोलवू लागले.

सोलापूरमध्ये 12 एप्रिलपर्यंत एक सुद्धा ‘कोरोना’चा रूग्ण नव्हता. त्याच्या एक महिना अगोदर महाराष्ट्रात पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी आपापल्या कार्यक्षेत्रात वेगवान उपाययोजना सुरू केल्या.

Solapur covid-19 deaths : मुख्य सचिवांनी सोलापूर जिल्हाधिकारी, आयुक्तांची खरडपट्टी काढली, सोलापूरमध्ये ‘कोरोना’चा देशातील सर्वाधिक मृत्यूदर

नागपूरचे महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी या एकाच महिन्यांत 25 लाख ( Tukaram Munde done good job in Covid-19 pandemic ) लोकांची तपासणी केली होती. राज्यभरात सर्वत्र अशाच उपाययोजना केल्या जात होत्या. पण सोलापूरमध्ये या महिनाभरात तपासणीसाठी प्रभावी उपाययोजना केल्या नव्हत्या ( Solapur administration shown negligence in Solapur covid-19 deaths ).

विशेष म्हणजे, सोलापूरमध्ये 12 एप्रिल रोजी मृत झालेला पहिला ‘कोरोना’ रूग्ण आढळला. त्यानंतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. सध्या दररोज 70 ते 80 ‘कोरोना’चे रूग्ण आढळत आहेत ( Solapur Covid-19 deaths ). जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांनी वेळीच योग्य उपाययोजना केल्या असत्या तर ही वेळ आली नसती अशी भावना मुख्य सचिव अजोय मेहता यांची झाली.

त्यामुळे मेहता यांनी जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांची खरडपट्टी काढली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी महापालिका आयुक्तांची बदली केली. शंभरकर यांची सुद्धा बदली होऊ शकते असा अंदाज मंत्रालयातील सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना व्यक्त केला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी