31 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयधनंजय मुंडेंचे पुतळे जाळणारे गेले कुठे ?

धनंजय मुंडेंचे पुतळे जाळणारे गेले कुठे ?

टीम लय भारी

मुंबई : अनुसूचित जातींतील गोरगरीब मुलांनाही परदेशी शिक्षणाचा लाभ मिळायला हवा या शुद्ध व उदात्त हेतूने सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी ( Dhananjay Munde )  उत्पन्न मर्यादेबाबत काही महिन्यांपूर्वी निर्णय घेतला होता. परंतु या निर्णयाच्या विरोधात अनेक संघटनांनी आंदोलने केली. त्यामुळे मुंडे यांना चांगला निर्णयसुद्धा मागे घ्यावा लागला. परिणामी आता धनदांडग्या असलेल्या दोन IAS अधिकाऱ्यांनी या योजनेचा लाभ उठवला आहे. या अभद्र प्रकारानंतर मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करणारे गेले कुठे असा सवाल निर्माण झाला आहे ( Where is the protesters who agitated against Dhananjay Munde ? ).

काही वर्षांपूर्वी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, सामाजिक न्याय खात्याचे सचिव दिनेश वाघमारे, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दयानंद मेश्राम यांच्या मुलांनी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेतला होता. टीका झाल्यानंतर बडोले यांनी हा लाभ सोडून दिला होता.

मुळातच या सरकारी योजनेचा लाभ वंचित, पिचलेल्या व गोरगरीब अनुसचित जातीच्या मुलांना मिळाला पाहीजे. परंतु धनदांडगे IAS, मंत्री यांची मुले हा लाभ उचलतात, व त्यामुळे अन्य गोरगरीब अनुसुचित जातीच्या मुलांवर अन्याय होतो, ही बाब लक्षात आल्यामुळे धनंजय मुंडे यांनी उत्पन्नाची मर्यादेची अट घालणारा निर्णय घेतला होता.

सहा लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मुलांनाच या शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचा निर्णय धनंजय मुंडेंनी घेतला होता. नंतर ही उत्पन्न मर्यादा आणखी वाढविण्याची तयारी त्यांनी दर्शविली. परंतु अनेक मागासवर्गीय संघटनांनी मुंडे यांच्या विरोधात राज्यभरात आंदोलने केली. मुंडे यांचे पुतळेही जाळण्यात आले. या आंदोलकांच्या दबावाला बळी पडून मुंडे यांनी अखेर स्वतःचाच एक चांगला निर्णय रद्द केला.

निर्णय रद्द झाल्यामुळे धनदांडग्यांनाही या योजनेचा लाभ मिळविण्याची संधी मिळाली. या संधीचा गैरफायदा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे व सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर या दोन्ही IAS अधिकाऱ्यांच्या मुलांनी घेतला. ‘लय भारी’नेच हा प्रकार चव्हाट्यावर आणला.

IAS अधिकाऱ्यांच्या मुलांनी अशा अनैतिक पद्धतीने शिष्यवृत्तीचा लाभ घेतल्याने समाजामधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. श्याम तागडे हे तर सामाजिक न्याय विभागाचे पालक आहेत. पालकाची भूमिका वटवत असताना त्यांनी आपल्या खात्याअंतर्गत असलेल्या सर्व घटकांकडे समान व न्याय पद्धतीने पाहायला हवे. पण त्यांनी स्वतःच या योजनेचा लाभ उठवल्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.

धनंजय मुंडे यांच्या विरोधात आंदोलन करणारे, पुतळे जाळणारे आता या IAS अधिकाऱ्यांच्या या संधीसाधूपणाबद्दल मूग गिळून गप्प का बसले आहेत, असाही सवाल उपस्थित झाला आहे.

शिष्यवृत्तीचा लाभ मिळविण्यासाठी अधिकाऱ्यांच्या लॉबीचे षडयंत्र

IAS व अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना आपल्या मुलांसाठी या योजनेचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांची ही लॉबी विविध सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांना भडकविण्याचे उद्योग करीत आहे. अधिकाऱ्यांचे ऐकून या संघटना आंदोलने करतात. आंदोलनांमुळे अधिकाऱ्यांच्या कुटुंबांना फायदा होतो. परंतु बिचाऱ्या गोरगरीब अनुसूचित जातीच्या मुलांचे मात्र नुकसान होते. संघटनांनी हलक्या कानाने अधिकाऱ्यांचे ऐकण्याऐवजी आपल्याच समाजातील गोरगरीबांना न्याय देण्याबाबत विचार करावा, अशी भावना जनतेमधून व्यक्त करण्यात येत आहे.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी