32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeटॉप न्यूजबापरे : आमदाराला 5 लाखांचे वीज बिल, बिल भरणार नसल्याचा दिला इशारा!

बापरे : आमदाराला 5 लाखांचे वीज बिल, बिल भरणार नसल्याचा दिला इशारा!

टीम लय भारी

विरार : बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष, आमदार हितेंद्र ठाकूर नव्या आणि जुन्या विवा कॉलेज हे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीही त्यांना 5 लाख रुपयांचे वीज बिल आकरण्यात आले आहे. ही रक्कम पाहून हितेंद्र ठाकूर संतप्त झाले. “मी लाईट बिल भरणार नाही, तुम्ही भरु नका?” असे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. (MLA Hitendra Thakur Viva College get 5 lakh electricity bill)

लॉकडाऊनपासून राज्यभरात वीज बिल अव्वाच्या सव्वा वसूल केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तक्रारी आल्या आहेत. सततच्या तक्रारींनी राज्य सरकारचीही डोकेदुखी वाढली आहे. सर्वसामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी जाहीर रित्या वाढीव वीजबिलाबाबत रोष व्यक्त केला आहे. राज्य सरकारने लाईट बिल कमी करण्याचा निर्णय घेतला आहे परंतु त्याच्यावर अद्यापही निर्णय झाला नाही. विशेष म्हणजे दर महिन्याला नागरिकांना वाढीव वीज बिल मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांचा रोष वाढला आहे.

लॉकडाऊनच्या काळात गेल्या चार महिन्यापासून शाळा, महाविद्यालय, कार्यालय पूर्णपणे बंद आहेत. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. अनेकांचे पगार कपात झाले आहेत. त्यामुळे घर कसं चालवायचं, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. मात्र अशा अवस्थेत लोकांना दिलासा मिळण्याऐवजी महावितरण कंपनीने चक्क मनमानी अॅव्हरेज वीज बिल देऊन लोकांची झोप उडवली आहे. त्यामुळे राज्य  सरकार नागरिकांना  दिलासा देईल का असा सवाल उपस्थितीत होत आहे.

कॉलेज बंद तरीही एवढं बिल…

हितेंद्र ठाकूर यांच्या नव्या आणि जुन्या विवा कॉलेज हे गेल्या चार महिन्यांपासून बंद आहे. मात्र तरीही त्यांना 5 लाख रुपयांचे वीज बिल आकरण्यात आले आहे. हे वीज बिल पाहून हितेंद्र ठाकूर यांना जबरदस्त शॉक लागला. या वीज बिलानंतर हितेंद्र ठाकूर यांनी महावितरण केवळ वीज ग्राहकांना लुटण्याचे काम करत आहे, अशी प्रतिक्रिया दिली. “मी स्वत: वीज बिल भरणार नाही, तुम्ही सुद्धा भरु नका?” असे हितेंद्र ठाकूर म्हणाले. “मी तुमच्यासोबत उभा आहे,” असे आवाहन हितेंद्र ठाकूर यांनी नागरिकांना केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी