32 C
Mumbai
Tuesday, May 7, 2024
Homeटॉप न्यूजनारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी - शिवसेना

नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी – शिवसेना

टीम लय भारी

मुंबई : नाणार प्रकल्प हा शिवसेनेचा पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे. अशी टीका भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणेंनी केली होती. त्याला शिवसेनेचे नेते ना. गुलाबराव पाटील यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले. राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत” अशा शब्दात  गुलाबराव पाटील यांनी जोरदार निशाणा साधला आहे. (Shivsena Leader Gulabrao Patil slams Narayan Rane )

राणेंना भाजपातही कुणी काम देत नाही…

“नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. ते घडीत काही बोलतात, नंतर काहीतरी बोलतात. बोललल्याशिवाय त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून ते तोच प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या पक्षात म्हणजेच भाजपातही कुणी काम देत नाही. त्यामुळे ते असं काही तरी बोलतात. ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले?” असाही प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे.

नारायण राणेंना शिवसेनेने खूप काही दिलं…

नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं. शिवसेनेत असताना ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले होते. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये. नारायण राणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं करत असतात अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी