33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रBreaking : राजेश टोपे आक्रमक, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे 9 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याप्रकरणी...

Breaking : राजेश टोपे आक्रमक, प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे 9 जणांना ‘कोरोना’ची लागण झाल्याप्रकरणी मागविला अहवाल

माण तालुक्यातील प्रकरण पोचले मंत्रालयात

‘वाळूपेक्षा ‘कोविड’ला प्राधान्य दिले असते तर हा प्रकार घडलाच नसता’

टीम लय भारी

मुंबई : रूग्णालय, आरोग्य अधिकारी, प्रांताधिकारी व तहसिलदार यांच्या बेफिकीरपणामुळे पांढरवाडीतील ( सातारा ) नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. ‘या प्रकरणाची आम्ही गंभीर दखल घेतली असून त्याबाबतचा अहवाल मागविला असल्याचे’ आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले ( Rajesh Tope instructed to Satara administration ).

मुख्य सचिव संजयकुमार यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. पांढरवाडी प्रकरणाची मी माहिती मागवून घेतो, असे संजयकुमार ‘लय भारी’ला म्हणाले ( Sanjaykumar will ask to administration about Corona cases in Satara ).

‘पांढरवाडीतील प्रकरण हे फारच गंभीर आहे. रूग्णालयाने बेफिकीरपणा दाखविलाच, पण सरकारी यंत्रणाही निष्काळजी वागली असल्याचे’ राजेश टोपे म्हणाले ( Negligence of Satara administration in Corona Pandemic ).

Rajesh Tope on Corona virus
‘कोरोना’मुळे गाव बंद केले आहे

रविवारी मी सातारा दौऱ्यावर होतो. त्यावेळी ‘सातारामधील आरोग्य यंत्रणेचीच शस्त्रक्रिया करण्याची गरज’ असल्याचे स्पष्ट मत मी बैठकीत व्यक्त केले आहे ( Rajesh Tope says, he is reluctant in Corona work in Satara ).

‘कोरोना’ महामारीमध्ये ‘मिशन मोडवर’ काम करा अशा सुचना सरकारने वारंवार दिलेल्या आहेत. पण पांढरवाडीच्या बाबतीत सातारा प्रशासन ‘मिशन मोड’वर वागले नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे उत्तम काम करीत आहेत. पण स्थानिक अधिकारी फारच निष्काळजी व अकार्यक्षम असल्याचे दिसत आहे, असेही टोपे म्हणाले.

पांढरवाडीच्या पाठीशी ठाम उभा : टोपे

झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. पांढरवाडी गावातील लोकांचा दोष नसतानाही तिथे ‘कोरोना’ शिरला आहे. पण लोकांनी घाबरू नये. मी गावकऱ्यांच्या पूर्ण पाठीशी आहे. पांढरवाडीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना मी कार्यालयातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. सर्व रूग्णांवर योग्य उपचार केले जातील, असे टोपे म्हणाले.

हे सुद्धा आवर्जून वाचा

‘लय भारी’ने पांढरवाडी प्रकरणाला वाचा फोडली

खळबळजनक :  साताऱ्यातील ‘त्या’ मृतदेहामुळे एकाच कुटुंबातील नऊ जणांना ‘कोरोना’ची लागण, प्रशासनाच्या बेफिकीरीचा परिणाम

राजेश टोपेंचे रात्रभर झाले जागरण, साताऱ्यातील दोन गंभीर घटना निस्तारण्यात गेला वेळ

IAS प्रभाकर देशमुख यांना ‘कोरोना’ची लागण

बापरे : आमदाराला 5 लाखांचे वीज बिल, बिल भरणार नसल्याचा दिला इशारा!

नारायण राणे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी – शिवसेना

महसूल मंत्र्यांकडेही चर्चा

पांढरवाडीतील प्रकरण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत पोचले आहे. या प्रकरणात रूग्णालय, आरोग्य यंत्रणेबरोबरच महसूल यंत्रणेचीही घोडचूक असल्याचे महसूल मंत्र्यांच्या कार्यालयात चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पांढरवाडीच्या प्रकरणात महसूल विभागाकडून गंभीर कार्यवाही होऊ शकते असे सूत्रांनी सांगितले.

‘कोरोना’साठी दुय्यम स्थान, ‘वाळू’वर अधिक प्रेम

माण तालुक्यातील प्रांताधिकारी व तहसिलदार यांचा ‘वाळू’ हा अत्यंत लाडका, जिव्हाळ्याचा व प्राधान्याचा विषय आहे. वाळू पळविण्याचे पुण्यकर्म करणाऱ्या ‘समाजसेवकां’चा प्रांताधिकारी व तहसिलदार कार्यालयात राबता असतो.

विद्यमान प्रांताधिकारी व तहसिलदारांनी ‘वाळू समाजसेवक’ घडविण्याचे काम केले आहे. असे काम यापूर्वी कोणत्याही अधिकाऱ्यांना जमले नव्हते, अशा शब्दांत स्थानिक लोकांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Rajesh Tope Corona virus
पांढरवाडीमध्ये ( जाधववाडी ) कोरोनाची चाचणी करताना आरोग्य कर्मचारी

‘वाळू समाजसेवकां’च्या अडचणी दूर करण्यासाठी तहसिलदार व प्रांत अर्ध्या रात्रीही तयार असतात. असेच काम या दोन्ही अधिकाऱ्यांनी ‘कोविड’साठी करायला हवे होते.

मृत महिला ‘कोरोना’बाधित होती हे समजल्यानंतरही प्रांताधिकारी व तहसिलदारांनी ‘लय भारी’ची बातमी प्रसिद्ध होईपर्यंत दखल घेतली नव्हती. वाळूचा विषय असता तर असे दुर्लक्ष केले असते का असाही सवाल स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

शनिवारी रात्रभर राजेश टोपे, त्यांचे खासगी सचिव चंद्रकांत थोरात, विशेष कार्य अधिकारी डॉ. सचिन जाधव या विषयाचा पाठपुरावा करीत होते. पण स्वतःची जबाबदारी असलेले तहसिलदार व प्रांताधिकारी यांनी कसलीही दखल या प्रकरणाची घेतली नव्हती. गावकऱ्यांना धीर देण्याचे सौजन्यही या दोन्ही अधिकाऱ्यांनी दाखविले नव्हते, असे सूत्रांनी सांगितले.

माणमधील पोलीस, आरोग्य अधिकाऱ्यांचे काम उत्तम

‘कोविड’काळात माणमधील पोलीस व आरोग्य यंत्रणा जबाबदारीने काम करीत आहे. पण तहसिलदार व प्रांताधिकारी अत्यंत बेजबादार आहेत. त्यांना कुठे गांभिर्याने वागावे हे सुद्धा कळत नाही, असेही माणमधील सूत्रांनी सांगितले.

मिनाज मुल्ला, दादासाहेब कांबळे, सुरेखा माने हवे होते

‘माण’मध्ये यापूर्वी मिनाज मुल्ला, दादासाहेब कांबळे प्रांताधिकारी म्हणून कार्यरत होते. सुरेखा माने तहसिलदार होत्या. अत्यंत कार्यक्षम, मनमिळाऊ, सामान्य लोकांसाठी झटणारे हे तिन्ही अधिकारी होते.

या तिन्ही अधिकाऱ्यांनी माण – खटावमधील सगळी गावे पिंजून काढली होती. जलसंधारणाची कामे इतकी प्रभावी केली होती, त्याची दखल मंत्रालयातून घेतली होती. आमिर खान यांच्या पाणी फाऊंडेशनने माणचे मॉडेल स्विकारले होते.

सुरेखा माने या अपंग होत्या. पण तरीही त्या जलसंधारणाच्या कामासाठी गावोगावी डोंगर दऱ्यातून फिरायच्या, अशा आठवणी स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहेत.

विद्यमान प्रांताधिकारी आश्विनी जिरंगे व तहसिलदार बाई माने या दोन्ही अधिकाऱ्यांची कार्यपद्धत नेमकी वरील अधिकाऱ्यांच्या उलटी आहे. या अधिकारी लोकांचे फोन सुद्धा उचलत नाहीत. एसएमएस पाठविले तरी त्याची दखल घेत नाहीत.

lay bhari

उत्पन्नाचे दाखले, नॉन क्रिमिलेयरसारख्या जनतेच्या गरजांमध्ये चालढकल करतात. तांबोळी नावाच्या एका विद्यार्थिनीला पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला होता. तातडीने त्यांना कागदपत्रे हवी होती. माण तालुक्यातील प्रतिष्ठीत मान्यवरांनी विनंती करूनही बाई माने यांनी दखल घेतली नव्हती. मंत्रालयातून फोन आल्यानंतर त्यांनी ही कागदपत्रे दिली.

एक व्यक्ती माने यांच्याकडे सहा महिन्यांपासून चकरा मारीत आहे. त्यांच्या सात बाऱ्यावर चुकीची नोंद झाली आहे. ती दुरूस्तीसाठी तो विनंती करीत आहे. दुरूस्तीसाठी माने यांच्या कार्यालयाने मोबदलाही घेतला आहे. पण दुरूस्ती केलीच जात नाही. दुरूस्ती का होत नाही, याचेही कारण सांगितले जात नाही. लोकांना छळण्याचे काम हे तहसिलदार – प्रांताधिकारी करतात असेही सूत्रांनी सांगितले.

मिनाज मुल्ला, दादासाहेब कांबळे व सुरेखा माने यांच्यासारखे अधिकारी असते तर त्यांनी माण तालुक्यात ‘कोविड’मध्ये उत्तम कामगिरी केली असती, असेही स्थानिक लोकांकडून सांगण्यात येत आहे.

राजकीय आशिर्वाद

माणमधील अधिकाऱ्यांना राजकीय आशिर्वाद आहे. विशेषतः आश्विनी जिरंगे यांना भक्कम राजकीय आशिर्वाद लाभलेला आहे. या आशिर्वादाच्या जोरावर त्या मंत्रालयातूनही सूत्रे फिरवित असतात. विशेषतः मागील सरकारमध्ये त्यांचा मंत्रालयात उत्तम प्रभाव होता. मागील सरकारमधील काही राजकीय लोकांशी हाताशी धरून आताच्या सरकारमध्येही त्या सूत्रे फिरविण्याचा प्रयत्न करतात असे सूत्रांनी सांगितले.

Mahavikas Aghadi

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी